Tarun Bharat

अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी/ मुंबई

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर शनिवारी सकाळपासून सीबीआयच्या विविध पथकांनी त्यांच्या घरासह कार्यालय व इतर ठिकाणी धाडसत्र राबवत विविध कागदपत्रे आणि वस्तु जप्त केल्या आहेत. याशिवाय शासकीय बंगला ज्ञानेश्वरी येथून सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतलेआहे. देशमुख यांच्यासह अन्य दोघांविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. यामुळे देशमुख यांच्या अडचणीत भर पडली आहे.

दरम्यान, याआधी सीबीआयने 11 तास देशमुख यांची चौकशी केली असून त्यांचे दोन स्वीय सहायक कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांचीही 10 तास चौकशी केली आहे. तर  या कारवाईबाबत शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजकीय सुडापोटी ही कारवाई केल्याचा आरोप केला आहे. तसेच याचा निषेधही केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांची बदली केल्यानंतर त्यांनी देशमुख यांच्यावरव 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा लेटरबॉम्ब टाकला होता. त्याचबरोबर ऍड. जयश्री पाटील यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी जनहित याचिका दाखल करुन याच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या आरोपांची सखोल चौकशी करण्याकरता सीबीआयला निर्देश दिले होते. तसेच त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयने अहवाल तयार करुन शनिवारी गुन्हाही दाखल केला तसेच लगेचच तपासास सुरुवातही केली आहे.

वाझेंनीही केला होता आरोप

परमबीरसिंग यांच्याप्रमाणेच निलंबीत पोलीस अधिकारी सचिन वाझे यानेही त्याला पुन्हा पोलीस सेवेत दाखल करुन घेतल्याबद्दल 2 कोटी रुपये मागणी देशमुख यांनी केल्याचा आरोप केला होता. यापुर्वी न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सीबीआयने परमबिर सिंग, अनिल देशमुख यांचे दोन स्विय सहाय्यक, तसेच देशमुख यांची चौकशी करीत, जबाब नोंदविला.

गुन्हा दाखल व तातडीने कारवाई

गुन्हा दाखल केल्यानंतर तातडीने सीबीआयने कारवाईला सुरुवात केली. अनिल देशमुख यांचे निवासस्थान तसेच कार्यालयासह अन्य दहा ठिकाणी छापे टाकले आहेत. देशमुख यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ज्ञानेश्वरी बंगल्याचीही सीबीआयने झडती घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली. रात्री उशीरा कारवाई करुन हे पथक निघून गेल्याचे सम्जते. ज्ञानेश्वरीतील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने ताब्यात घेतले आहे. तसेच विविध कागदपत्रांची छाननी करण्यात येत आहे. त्यांच्या नागपूरमधील निवासस्थानीही कारवाई करण्यात आली असून अनेक कागदपत्रे ताब्यात घतेली आहे.

यापूर्वीही करण्यात आली होती चौकशी

सीबीआयच्या दिल्लीतील पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱयांच्या टीमने अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची सलग 9 तास चौकशी केली होती.  सीबीआयच्या टीमने अनिल देशमुखांच्या नागपूर आणि काटोल याठिकाणी असणाऱया घरांवर सीबीआयने छापेमारी केल्याची देखील माहिती समोर आली आहे. तसेच वरळी येथील सुखदा इमारतीत अनिल देशमुख यांचे घर आहे, त्या ठिकाणीही छापा टाकला आहे.

राजकीय उद्दीष्टांसाठी धाडसत्र न्यायालयाकडून चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम

Related Stories

दक्षिण-पश्चिम अन् दक्षिणपूर्व आशियाई देशांमधील फैलाव

Patil_p

मोदी येत आहेत, बाल्कनीत कपडे वाळत घालू नका…

datta jadhav

राज्यांच्या गृहमंत्र्यांचे चिंतन शिबिर लवकरच

Amit Kulkarni

जुलैमध्ये जीएसटी संकलन 1.49 लाख कोटींवर

Patil_p

जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

ड्रग्ज प्रकरणी अभिनेत्री रागिणी द्विवेदीला अटक

Patil_p