Tarun Bharat

अनिल देशमुखांना धक्का; ईडीच्या कोठडीत वाढ

मुंबई / प्रतिनिधी

मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाची नऊ दिवसांच्या अतिरिक्त कोठडीची विनंती विशेष सुटी न्यायालयाने शनिवारी फेटाळून त्याऐवजी न्यायालयाने मंगळवारी अटक झालेल्या देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती पण ईडीने मुंबई उच्च न्यायालयात अपील केल्याने ईडीच्या कोठडीत 6 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना रविवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून वसुली प्रकरणात मोठा झटका बसला आहे. वास्तविक, उच्च न्यायालयाने देशमुख यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा विशेष न्यायालयाचा आदेश रद्द ठरवत त्यांना १२ नोव्हेंबरपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत पाठवले आहे.पीएमएलए विशेष न्यायालयाने शनिवारी देशमुख यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यास नकार देत त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाने देशमुखांना धक्का बसला आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात 12 तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर देशमुख (71) यांना ईडीने 1 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. देशमुखांनी या प्रकरणात ईडीने जारी केलेले अनेक समन्स वगळले होते परंतु गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने ते सोमवारी एजन्सीसमोर हजर झाले. येथील विशेष सुटी न्यायालयाने मंगळवारी त्याला 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली.Related Stories

दुकानदार व कामगारांना दोन डोसे घेणे आवश्यक

Patil_p

नारायण राणेंच्या ‘त्या’ टीकेला आदित्य ठाकरेंचे उत्तर, म्हणाले…

Archana Banage

राज्यातील ५० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात सायंकाळ पर्यंत ६६ पॉझिटिव्ह

Archana Banage

शिंदे सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे

Abhijeet Khandekar

ओबीसी नेतृत्व तयार होऊ न देण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादीचा डाव – हंसराज अहिर

Archana Banage