Tarun Bharat

अनिल देशमुख आज देखील ईडी कार्यालयात गैरहजर, वकील म्हणाले…

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आत्तापर्यंत ईडीने 5 वेळा समन्स बजावले असून आज सकाळी अकरा वाजता त्यांना ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र आज देखील अनिल देशमुख हजर न राहता त्यांचे वकील इंदरपाल सिंग अनिल देशमुखांना ईडीसमोर हजर राहता येणार नसल्याचा अर्ज दाखल करण्यासाठी ईडीच्या कार्यालयात आले होते.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना वकीलांनी सांगितले की, आम्ही ईडीला काही काळ वाट पाहण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात आम्ही याचिका दाखल केली असून, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत थांबावे, अशी भूमिका मांडणारे पत्र आम्ही ईडीला दिले आहे. तसेच तपासामध्ये आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर आम्ही चौकशीसाठी हजर राहू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलेत आहे.

दरम्यान, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी 100 कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांसंदर्भात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अनिल देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या कारवाईमध्ये ईडीने आत्तापर्यंत अनिल देशमुख यांचे हॉटेल, कॉलेज, घर अशा सर्वच ठिकाणी छापेमारी केली अनिल देशमुख यांना पाच वेळा समन्स बजावले आहेत. तसेच देशमुख यांचे स्वीय सचिव व स्वीय सहाय्यक, यांना अटक करण्यात आली आहे. 

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात सहापर्यंत 458 पॉझिटिव्ह, 11 जणांचा कोरोनाने बळी

Archana Banage

गोवा चित्रपट महोत्सावात काश्मिर फाईल्स वर टिकेची झोड; ज्युरींनी फटकारले

Abhijeet Khandekar

102 व्या घटनादुरूस्तीमुळे निर्माण झालेला मराठा आरक्षण सुनावणीतील संभ्रम दूर करा

Archana Banage

महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या मोदींविरोधात मिरजेत काँग्रेसची तीव्र निदर्शने

Abhijeet Khandekar

तालिबान्यांनी पहिल्या पत्रकार परिषदेत महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे दिले वचन

Archana Banage

कोगनोळी टोल नाक्यावर महाराष्ट्रातील नेते पोलीसांच्या ताब्यात

Archana Banage