Tarun Bharat

अनिल देशमुख ईडी कार्यालयात चौकशीसाठी राहणार हजर

Advertisements

मुंबई/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर निवासस्थानी ईडीने शुक्रवारी छापेमारी केली. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नागपूरमध्ये ईडीने धाडी टाकल्यानंतर आता अनिल देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे. त्यामुळे अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात आज ११ वाजता हजर होणार आहेत. दरम्यान काल झालेल्या चौकशी नंतर देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना अटक केली आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना अटक केल्यानंतर ईडीने समन्स बजावला आहे. अनिल देशमुख चौकशीकरता ११ वाजता हजर राहण्याचे ईडीचे आदेश आहेत. परंतु, ईडीची चौकशी टाळण्यासाठी अनिल देशमुख हे अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली अशी शक्यता होती. पण, देशमुख यांनी चौकशीला सामोरं जाण्याची तयारी केली आहे. ठरल्याप्रमाणे अनिल देशमुख ११ वाजता चौकशीला हजर राहणार आहेत.

दरम्यान, शुक्रवारी अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या निवासस्थानासह मुंबईतल्या ज्ञानेश्वरी, सुखदा या निवासस्थानी ईडीने छापेमारी केली. ईडीच्या पथकाने मुंबईत अनिल देशमुखांच्या निवासस्थानी सात तासांहून अधिक काळ चौकशी केली. त्यानंतर देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.

Related Stories

साताऱयात ‘हिवसाळा..!’

Patil_p

जगाच्या पोशिंद्याची जिल्हाधिकार्‍यांच्या हाकेला साद

Abhijeet Shinde

महाराष्ट्रातील मंदीरे उघडण्यासाठी भाजपचे घंटानाद आंदोलन

Rohan_P

पुराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधावा : मुख्यमंत्री बोम्माई

Abhijeet Khandekar

रिक्षा व टेम्पोचालकांना सर्वतोपरी सहकार्य करू : आ. प्रकाश आवाडे

Abhijeet Shinde

सोलापुरात 93 वर्षांच्या आजी झाल्या कोरोनामुक्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!