Tarun Bharat

अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून कारवाईची शक्यता, अजामीनपात्र वाॅरंट काढणार?

Advertisements

मुंबई/ प्रतिनिधी

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तीन वेळा समन्स बजावूनही चौकशीला गैरहजर राहिल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. देशमुख यांना ईडीने तीन वेळा समन्स बजावूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्याविरूद्ध लवकरच अजामीनपात्र वाॅरंट काढले केले जाणार आहे. त्याबाबत कायदेशीर बाबींची पूर्तता केली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

देशमुखांच्या मुलाचीही चौकशीकडे पाठ
अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला ईडीने समन्स पाठवून मंगळवारी चौकशीसाठी ईडी कार्यलयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यानेही त्याकडे पाठ फिरवल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये स्वतःसह कुटुंबातील सदस्यांनाही ईडीच्या कठोर कारवाईपासून संरक्षण मागितले आहे. त्यामुळे ऋषिकेश देशमुख हे चौकशीसाठी गैरहजर राहिले असल्याचे सांगण्यात येते.

Related Stories

राशिवडेत चार एकरातील ऊस आगीच्या भक्षस्थानी

Abhijeet Shinde

ब्रिटनच्या विमानांना 7 जानेवारीपर्यंत भारतात ‘नो एन्ट्री’

datta jadhav

चित्रपट महामंडळाच्या निवडणूक वादावर धर्मादाय आयुक्तांचे आदेश, अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडणूक तारखा होणार रद्द

Abhijeet Shinde

पँगाँग भागात चीन उभारतोय पूल

Sumit Tambekar

आता सरपंच, नगराध्यक्षांची निवड होणार थेट जनतेतून

Abhijeet Khandekar

कोरोनामुळे देशात युद्धजन्य परिस्थिती; संजय राऊत यांनी केंद्राकडे केली ‘ही’ मागणी

Rohan_P
error: Content is protected !!