Tarun Bharat

अनिल देशमुख यांच्या ईडीच्या कोठडीत वाढ

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED)कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी होणार्‍या सुनावणीपूर्वी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची वैद्यकीय तपासणी करण्यात असुन देशमुख यांची अंमलबजावणी संचालनालयाची कोठडी शुक्रवारी संपणार होती पण त्यामध्ये वाढ होऊन १५ नोव्हेंबरपर्यंत सुनावण्यात आली आहे

मुंबई उच्च न्यायालयाने ७ नोव्हेंबर रोजी देशमुख यांना १२ नोव्हेंबरपर्यंत अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कोठडी सुनावली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी त्यांच्यावर लावलेल्या खंडणी आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांप्रकरणी त्यांना १ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांचे माजी सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याच्याकरवी मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून १०० कोटी रुपये गोळा करणे यासह अनेक गैरकृत्यांमध्ये देशमुख यांचा सहभाग असल्याचा आरोप सिंग यांनी केला होता.

Related Stories

विट्यात आमदार गोपीचंद पडळकर यांची नगरपालिकेसाठी चाचपणी

Archana Banage

Kolhapur : संभाजीराजेंची रविवारी विशाळगडला भेट, सद्यःस्थितीची पाहणी करणार

Abhijeet Khandekar

मुतगा आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ

Omkar B

कोरोना वाढत असल्याने जागृत होणे आवश्यक

Patil_p

शहरातील मोकाट कुत्री, जनावरांचा बंदोबस्त करा

Patil_p

चाळीस अंतराळ प्रवाशांचे पृथ्वीवर सुखरूप अवतरण

Patil_p