Tarun Bharat

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री!

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :


गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर नवे गृहमंत्री म्हणून राजेश टोपे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आदींची नावे चर्चेत होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. यासोबतच गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. 


दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली आहे.


दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या कामागर आणि राज्य उत्पादन शुल्क खात्याचा कार्यभार होता. महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. वळसे पाटील यांनी यापूर्वी विधानसभा अध्यक्षपद देखील भूषवले होते. त्या अनुभवाचा फायदा महाविकासआघाडीला झाला होता.

दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आला आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात यावा, 

Related Stories

पाच वर्षात 25 कोटींचा गहू, तांदूळ खराब

tarunbharat

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले

Abhijeet Shinde

जनतेला कर्मयोगी सरकार हवयं, बोलघेवडे नाही : फडणवीस

Abhijeet Shinde

दारूविक्रीसाठी ‘होम डिलिव्हरी’चा विचार करा

Patil_p

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 264 पोलिसांना कोरोनाची बाधा; 3 मृत्यू

Rohan_P

सुरत : बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांवर दगडफेक, पाच जण ताब्यात

Rohan_P
error: Content is protected !!