Tarun Bharat

अनेक शर्यती गाजविणारा किणयेतील ‘बबल्या’ बैल हरपला

वार्ताहर /किणये

किणये गावातील रघुनाथ खोबाणा डुकरे यांचा अनेक शर्यती गाजविणाऱया बैलाचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. घरातील शर्यतीच्या बैलाचा आकस्मित मृत्यू झाल्याने डुकरे कुटुंबीय हतबल झाले असून, शर्यतप्रेमी नागरिकांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शर्यतीचे बैल पाळणे डुकरे कुटुंबीयांचा वडिलोपार्जित छंद आहे. आजही त्यांच्या घरातील रघुनाथ डुकरे ,मारुती डुकरे व बंधू हा छंद जोपासतात. त्यांच्या घरात सध्या शर्यतीचे तीन बैल आहेत. त्यापैकी हुकमी एक्का बबल्या बैल बुधवारी दगावला. त्यामुळे सव्वा दोन लाखाचे नुकसान झाले आहे.

 बैलाच्या पायाला किरकोळ दुखापत झाली होती. त्याला नेमका आजार कोणता झाला आहे याचा अंदाज डॉक्टरांना आला नाही. त्याच्यावर उपचारही केले. पण अचानक बुधवारी रात्री बैलाचा मृत्यू झाला. बैलाला पाहण्यासाठी शर्यतप्रेमींनी एकच गर्दी केली होती. सध्या तालुक्मयाच्या पूर्व भागामध्ये लम्पिस्कीन आजार सुरू आहे. त्या आजारानेच त्या बैलाचा मृत्यू झाल्याची चर्चा होती. पण, त्या बैलाचा मृत्यू पायाला जखम झाल्याने झाला असल्याची माहिती मारुती डुकरे यांनी दिली आहे.

कुटुंबीयांना अश्रू अनावर

बेळगावसह, खानापूर चंदगड आदी ठिकाणी होणाऱया बैलगाडी शर्यतीमध्ये अनेक बक्षिसे मिळविलेला ‘बबल्या’ बैलाचा मृत्यू झाल्यामुळे साऱयांनाच अश्रू अनावर झाले होते. बुधवारी बैलावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Stories

कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा ठप्पच

Amit Kulkarni

जिल्हय़ात आतापर्यंत 92.47 टक्के रेशनवरील आहारधान्याचा पुरवठा

Patil_p

खानापूर तालुका म. ए.युवा समितीची रचना लवकरच

Amit Kulkarni

नव्या कोरोनापासून बचावासाठी वडगावात मारुतीला साकडे

Patil_p

बागलकोट येथे ट्रक चोरटय़ास अटक

Patil_p

बेकायदा दारुवाहतुक करणाऱया आलिशान कारवर कारवाई

Tousif Mujawar