Tarun Bharat

अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलाची विक्री

सुनावणीदरम्यान सत्र न्यायालयात कथन

प्रतिनिधी/ रत्नागिरी

लग्नापूर्वी आलेल्या अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलाला विकण्यात याव़े  तसेच या व्यवहारातून जे पैसे मिळतील ते पीडितेने सासरच्या मंडळींना द्यावे, असा ठराव गावच्या बैठकीत झाल्याचा धक्कादायक प्रकार खटल्यादरम्यान सत्र न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान पुढे आला आह़े

 अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल़ ड़ी बिले यांच्यासमोर बलात्कार प्रकरणाची सुनावणी सुरू होत़ी त्या दरम्यान अर्भक विक्रीचा मुद्दा पुढे आल़ा लांजा तालुक्यातील पश्चिम भागात रस्त्यालगत असलेल्या एका गावात माहेर असलेल्या  म†िहलेने फिर्याद दिल्यानंतर खटल्याचे कामकाज सुरू झाले होत़े  या पीडित तरूणीचे लग्न झाल़े त्यानंतर 3 महिन्यांनी तिला बरे वाटत नव्हते. म्हणून वैद्यकीय तपासणी करण्यात आल़ी यावेळी ती 8 महिन्यांची गरोदर असल्याची बाब तिच्या सासरच्या मंडळींच्या निदर्शनास आल़ी या प्रकरणी तिच्या सासरच्या मंडळींकडून पीडितेला जाब विचारला असता तिने कुर्णे बौद्धवाडी येथील दिलीप यशवंत कदम (40, ऱा कुर्णे बौद्धवाडी) या तरूणाचे नाव घेतल़े

  दरम्यान पीडितेने दिलीप कदम याच्याविरूद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार लांजा पोलिसांत दाखल केल़ी पोलिसांनी दिलीप याच्याविरूद्ध भादंवि कलम 376 नुसार गुन्हा दाखल केल़ा तपासाच्या अखेर पोलिसांनी न्यायालयापुढे दोषारोपपत्र दाखल केल़े

  खटल्यादरम्यान पीडित मुलीने न्यायालयापुढे दिलेल्या जबाबामध्ये असे कबुल केली की, सासरच्या मंडळींची फसवणूक झाली असे वाटू नये यासाठी जन्मलेले मूल विकण्यात याव़े तसेच यातून मिळणारे पैसे हे सासरच्या मंडळींना देण्यात यावे, असा ठराव गावी झालेल्या बैठकीत घेण्यात आल़ा  त्यानुसार पीडितेने जन्मलेले मुल हे मुंबई येथील इसमाला देण्यात आल्याची माहिती पीडितेने न्यायालयापुढे दिल़ी  या प्रकरणी न्यायालयाने आपल्या निकालात असे म्हटले की, आरोपी दिलीप याने पीडितेशी जबरदस्तीने शरीरसंबध प्रस्थापित केल्याचे दिसत नाह़ी सासरच्या मंडळींना गरोदर असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर तिने तक्रार दाखल केल़ी तसेच जन्माला आलेले मूल विकून ते पैसे सासरच्या मंडळींना देण्याचे तिचे कृत्य हे अमानवीय आह़े यातून पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये फोलपणा असल्याचे मत न्यायालयाने नोंदवल़े तसेच आरोप असलेल्या दिलीप कदम याची निर्दोष मुक्तता केल़ी

Related Stories

दशावतारी लोककला संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

NIKHIL_N

अनारी ग्रामस्थांनी जोपासलेय वृक्ष संवर्धनाची चळवळ!

Patil_p

मळेवाड येथे बलिदान मास निमित्त श्लोक पठण

Anuja Kudatarkar

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

Archana Banage

जिह्यात एकही व्हेंटीलेटर बेड शिल्लक नाही

Patil_p

राजापुरात बेपत्ता तरुणाचा खून?

Patil_p