Tarun Bharat

अन्यथा आज दिगंबर कामत भाजपमध्ये असते-दामू नाईक

प्रतिनिधी / मडगाव

मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी दोन वेळा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला नाही. जर त्यांना प्रवेश दिला असता तर ते आज भाजपमध्ये असते. अशावेळी त्यांनी पक्षांतर विरोधी मुद्दावर त्यांनी बोलू नये तसेच प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांचे मानसिक संतुलन बिघडले म्हणणाऱया काँग्रेसच्या कथित प्रवक्त्या पल्लवी भगत यांचा भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक निषेध केला.

मडगावात काल भाजपने पत्रकार परिषद घेऊन प्रदेश अध्यक्ष सदानंत शेट तानावडे यांच्यावर टीका करणाऱया काँग्रेसच्या प्रवक्त्या पल्लवी भगत यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या तथाकथित प्रवक्त्या पल्लवी भगत यांना गोव्याच्या राजकारणाचा किती इतिहास ठावूक आहे हा संशोधनाचा प्रश्न आहे. मुळात पल्लवी भगत यांच्या नावे जारी करण्यात आलेले प्रसिद्धी पत्रक हे त्यांचे नसून ते त्यांना लेखी स्वरूपात तयार करून देण्यामागे वेगळी व्यक्ती गुंतलेली आहे असे दामू नाईक म्हणाले.

पल्लवी भगत यांनी जर पत्रकार परिषद घेतली तर त्यांना पत्रकारांनी विचारलेल्य प्रश्नाची उत्तरे सुद्धा द्यायला जमणार नाही. गेली अनेक वर्षे दिगंबर कामत हे राजकारणात आहेत व त्यांनी पक्षांतर बंदी कायदय़ावर बोलणे म्हणजे  एक विनोद आहे. एका पक्षातून निवडून आल्यानंतर राजीनामा देऊन दुसऱया पक्षात जाणे हेच पक्षांतर आहे. गोव्यात भाजपच्या इतिहासात असा प्रसंग एकदाच घडला असून तो सुद्धा दिगंबर कामत यांनीच केल्याचे त्यांनी सांगितले.

काल-परवा काँग्रेसच्या प्रवक्त्या झालेल्या पल्लवी भगत यांनी स्व. मनोहर पर्रीकराचा उल्लेख करताना यू टर्न असा उल्लेख करतात, आज पर्रीकर हे या संसारात नाही. अशा वेळी हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल राजकीय आखाडे बोलणे, जे लिखित नाही किंवा ऐतिहासिक पुरावे नाहीत यावर बोलणे त्यांना शोभा देत नाही. जी व्यक्ती नाही, ती आत्ता येऊन स्पष्टीकरण देऊ शकत नाही असे दामू नाईक म्हणाले.

पल्लवी भगत यांनी भाजपकडे लक्ष देण्याच्या ऐवजी काँग्रेस पक्ष सांभाळण्याची गरज आहे. काँग्रेस पक्षात जे काही चालले आहे त्यावर विचार मंथन करावे असा सल्ला दामू नाईक यांनी दिला आहे.

या पत्रकार परिषदेला मडगाव भाजप मंडळ अध्यक्ष रूपेश महात्मे तसेच शर्मद पै रायतूरकर उपस्थित होते.

Related Stories

चोर्ला घाट परिसरात एसटी-जीप अपघातामुळे वाहतूक ठप्प

Patil_p

पिसुर्ले येथील खनिज वाहतुकीला स्थगिती

Omkar B

कर्मचारी भरती आयोग फक्त ‘फार्स’

Amit Kulkarni

पणजीत आज कार्निव्हल मिरवणूक

Amit Kulkarni

येत्या 20 रोजी राज्यात उच्चस्तरीय बैठक

Amit Kulkarni

सासष्टीत लगबग ‘पुरूमेंताची’

Amit Kulkarni