Tarun Bharat

“…अन्यथा कोकणवासीय ‘कोल्हापुरी चप्पल’ हातात घेऊन नवाब भाईंचं स्वागत करतील..!”

मुंबई/प्रतिनिधी

राज्यातील तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना भेट दिली. यावेळी दरेकर यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. याचबरोबर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी कोकण दौऱ्यावर होते. या दरम्यान, त्यांच्या दौऱ्यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनी टीका केली होती. विरोधकांचा दौरा हा सूट-बूट दौरा असल्याचं नवाब मालिकांनी म्हंटल होतं. शिवाय, फडणवीस व दरेकरांनी या दौऱ्यात वापरलेल्या बुटांबद्दलही टिप्प्णी केली होती. यावर आता प्रविण दरेकरांनी नवाब मलिक यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

“विरोधी पक्ष नेत्यांच्या बुटांकडे लक्ष देण्यापेक्षा नुकसानग्रस्त कोकणवासीयांना मदत करा!, अन्यथा, पुमा, नायकी बाजूला राहिलं, कोकणवासीय ‘कोल्हापुरी चप्पल’ हातात घेऊन नवाब भाईंचं स्वागत करतील..!” असं विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

काय म्हणाले होते नवाब मलिक…
विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर असताना “ या दौऱ्यात दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांचे एकसारखेच बूट होते. आता दौऱ्यासाठी ते एकसारखे बूट खरेदी करत आहेत, मग ते दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर प्रश्न निर्माण करण्याचा कोणताही अधिकार नाही. दोघेही नेते बूट एकसारखे घालत आहेत, म्हणजे दौऱ्यावर जाण्यासाठी तयारी करत असताना बूट खरेदी करत आहेत. म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये जाण्यासाठी बूट नवीन खरेदी करावे लागत आहेत. कारण, आपण फोटो पाहिला तर दोन्ही विरोधी पक्षनेते हे एकसारखेच नवीन बूट घालून ते दौऱ्यावर होते, हे सगळ्या फोटोंमधून दिसून येते.” असे मलिक म्हणाले.

Related Stories

”मराठा आरक्षणाच्या संदर्भातील आज आलेला निकाल दु:खद आणि निराशाजनक”

Archana Banage

पुढील तीन दिवस पावसाचे

Patil_p

सांगली : लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर घरीच उपचार शक्य

Archana Banage

भारत-चीनमधील तणाव नियंत्रणात

datta jadhav

थकबाकीसह चालूबिल न भरल्यास वीजपुरवठा होणार खंडित

Tousif Mujawar

सातारा तालुक्यातील रात्रीत 137 जण बाधित

Patil_p