Tarun Bharat

…अन्यथा सेवा स्थगित करू

डॉक्टरांवर हल्ला करणाऱयांवर कारवाई न केल्यास सेवा स्थगित करण्याचा आयएमएचा इशारा

प्रतिनिधी / बेळगाव

सरकारनेच दिलेल्या आदेशाचे पालन करत खासगी हॉस्पिटल्समध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र आमच्यावरच हल्ले होत असतील तर आम्ही पुढील आठवडय़ापासून आमची सेवा स्थगित करू. मात्र त्यानंतर उद्भवणाऱया गंभीर परिस्थितीला आम्ही जबाबदार असणार नाही. अशी स्पष्ट भूमिका आयएमएने घेतली असून त्यानुसार तशी कल्पना सोमवारी रूजू झालेले जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात याचवेळी कोविड संदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यासाठी आमदार अंजली निंबाळकर, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, माजी मंत्री सतिश जारकीहोळी, विधान परिषद सदस्य महांतेश कौजलगी, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, जि. पं. च्या अध्यक्षा आशा ऐहोळे आदी उपस्थित होते. आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी हल्ले होत असल्याने आम्ही काम थांबविलेले बरे असे सांगताच आमदारांसह सर्वांनीच कृपया अशी भूमिका घेऊ नका, तुमची आम्हाला या काळात नितांत गरज आहे. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. तुम्हाला सर्व तऱहेचे संरक्षण देऊ असे स्पष्ट केले.

शहापूर हट्टीहोळ गल्लीतील माई हॉस्पिटलच्या डॉक्टर व कर्मचाऱयांवर रविवारी रात्री हल्ला झाला. जमावाने हॉस्पिटलचे डॉक्टर आणि कर्मचारी यांना मारहाण केली. याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी आयएमएने तातडीची बैठक घेतली.

Related Stories

आविष्कार-आयएमईआरमध्ये समन्वय करार

Omkar B

बस प्रवाशांच्या संख्येत वाढ

Omkar B

कंग्राळी बुद्रुकमध्ये दौडची उत्साहात सांगता

Amit Kulkarni

सोमवारी रुग्णसंख्या शून्यावर

Amit Kulkarni

गटर खोदल्याने रुग्णांना होतोय नाहक त्रास

mithun mane

आश्वासनानंतर शेतकऱयांचे आंदोलन मागे

Omkar B