Tarun Bharat

..अन् ते अतिक्रमीत शेड काढून घेण्याचा शेड मालकाचा उपनगराध्यक्षांना शब्द

प्रतिनिधी / सातारा

तहसील कार्यालयाच्या पाठीमागे नगरसेविका सीता हादगे यांच्या प्रयत्नामुळे हॉकर्स झोन तयार करण्यात आला आहे. तेथे पालिकेच्या वतीने किरकोळ विक्रेत्यांना जागा देण्यात येणार आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात एका सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकाच्या कृपेने एका विक्रेत्याने चक्क शेडच उभे केले. याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते राम हादगे यांनी केल्यानंतर उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी अतिक्रमण विभागाचे पथक पाठवले. यावेळी त्या अतिक्रमण करणाऱ्याची चांगलीच तंतरली. शेवटी ते अतिक्रमण केलेले शेड दोन दिवसात काढून घेतो, असा शब्द उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना दिल्याने कारवाई तूर्तास स्थगित करण्यात आली आहे.

सातारा तहसील कार्यालय ते काँग्रेस कमिटी यादरम्यान अनेक नेपाळी स्वेटर विक्री करणारे होते. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत होती. ते सर्व हॉकर्स अतिक्रमण हटाव वेळी हटवले होते. त्याचवेळी नगरसेविका सीता हादगे यांनी तहसीलदार कार्यालयाच्या पाठीमागे हॉकर्स झोन विकसित करण्याची मागणी करून तो तयार करून घेतला. मात्र, तांत्रिक बाबींमुळे तेथे हॉकर्सधारक व्यवसाय करण्यास गेले नाहीत. लॉकडाऊनच्या काळात तेथे एका विक्रेत्याने चक्क शेडच उभे केले. त्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते राम हादगे यांनी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्याकडे केली. मनोज शेंडे यांनी अतिक्रमण विभागास सूचना करताच पथक तेथे गेले तर त्या शेड मालकाची चांगलीच तांतरली. त्या शेड मालकाने नगरसेवकास ही माहिती दिली. पथक, तो शेड मालक व तो नगरसेवक असा सर्व गोतावळा उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्या समोर गेले. सामाजिक कार्यकर्ते राम हादगे यांनी हॉकर्स झोनमध्ये शेड उभे करता येत नाही, हे पटवून सांगितले. त्यावर दोन दिवसात शेड काढतो, असा शब्द त्या अतिक्रमण केलेल्या शेड मालकाने दिला असून तूर्तास ही कारवाई थांबवली आहे. मात्र दोन दिवसात ते शेड हटवले जाते काय ? याकडे लक्ष लागून आहे.

तरुण भारतची नजर

तहसील कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत शेड मारल्याचे वृत्त तरुण भारतने प्रसिद्ध केले आहे. त्यावरून दोन दिवसात हे शेड हटवले जाते का ? याकडे तरुण भारतची नजर आहे.

Related Stories

राजधानी साताऱयात साकारतेय शिवसृष्टी

Omkar B

गोडोली तळय़ाचा परिसर उजाळला

Patil_p

कुंटणखाना महिला चालकासह साथीदार गजाआड

Patil_p

तुमची मग्रुरी थांबवा!…उपकार करत नाही, घाटगेंचा मुश्रीफांना इशारा

Rahul Gadkar

संभाजीराजेंची ठरवून कोंडी; फडणवीस यांचा शिवसेना, राष्ट्रवादीवर हल्लाबोल

Archana Banage

आरोग्य राज्यमंत्री यड्रावकरांकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांची पाहणी

Archana Banage