Tarun Bharat

अन् त्याने डोंगरमाथ्यावरुन सामना पाहिला!

स्टेडियमचे दरवाजे बंद असल्याने सुपरफॅन सुधीर गौतमने शोधला मार्ग

पुणे : बंदिस्त स्टेडियममध्ये खेळवली जात असल्याने चाहत्यांना प्रेक्षकांच्या गॅलरीत जाऊन सामन्याचा प्रत्यक्ष आनंद लुटता येत नाही. यामुळे हजारो चाहत्यांप्रमाणे सुधीर कुमार गौतम याचीही निराशा झाली. पण, भारतीय संघाचा प्रत्येक सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहणाऱया या अवलियाने जिद्द न सोडता पुण्यातील पहिल्या वनडे सामन्यादरम्यान थेट डोंगरमाथ्यावर पोहोचत तेथून सामन्याचा आनंद लुटला.

सुधीर गौतम 2007 पासून भारतातील जवळपास प्रत्येक सामन्याला हजर राहण्याचा प्रयत्न करत आला आहे आणि अगदी विदेश दौऱयातही सामन्यांना हजर राहून भारतीय संघाचे मनोबल उंचावण्याचा त्याचा प्रयत्न राहिला आहे. अंगाखांद्यावर तिरंगा रंगवून आणि ‘मिस यू सचिन’ असे पाठीवर लिहून हजर राहणारा सुधीर गौतम भारताचा 2011 विश्वचषक विजय हा आपल्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण मानतो.

Related Stories

राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा कोईमतूरमध्ये

Patil_p

आशिया चषक पात्रतेसाठी शेवटच्या दिवसापर्यंत चुरस

Patil_p

गावसकर म्हणतात षटकात दोन बाऊन्सर्सची परवानगी द्या!

Patil_p

ओकिफ प्रथमश्रेणी क्रिकेटमधून निवृत्त

Patil_p

जोकोविच-रुड यांच्यात अंतिम लढत

Patil_p

गुजरात जायंटसच्या मेंटरपदी मिथाली राज

Patil_p