Tarun Bharat

…अन् विमानाचा फुटला टायर

नवी दिल्ली/प्रतिनिधी

कन्नूरहून कर्नाटककडे येत असलेल्या इंडिगो विमानातील सर्व प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. सोमवारी संध्याकाळी कर्नाटकातील हुबळी विमानतळावर उतरताना इंडिगो विमानाचा टायर फुटला. तथापि, विमानातील सर्व प्रवासी आणि चालक दल सदस्य सुरक्षित आहेत. मंगळवारी विमान कंपनीकडून ही माहिती देण्यात आली. एअरलाइन्सने सांगितले की सध्या विमान तपासणीसाठी घेण्यात आले आहे. इंडिगोचे विमान 6e -7979 कन्नूरहून हुबळीला जात होते. सोमवारी सायंकाळी लँडिंग दरम्यान ही घटना घडली. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. मंगळवारी विमान कंपनीने एक प्रसिध्दीपत्रक जारी करत माहिती दिली.

एअरलाइन्स अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सोमवारी रात्री 8:03 वाजता विमानाने लँडिंगचा प्रयत्न केला परंतु उलट दिशेने जोरदार वारा असल्याने ते शक्य झाले नाही. साधारण अर्ध्या तासाने ते विमान उतरले. अधिकारी पुढे म्हणाले, “लँडिंगचा त्रास आणि विरुद्ध दिशेने जोरदार वारा यामुळे कदाचित टायर फुटला असवा. विमानात बसलेले सर्व प्रवासी स्वतःहून उतरले. दरम्यान सर्व प्रवासी आणि विमानातील कर्मचारी सुखरूप आहेत.

Related Stories

बेंगळूर हिंसाचार प्रकरणी एकूण ७ एफआयआर दाखल

Archana Banage

सांगली : कोरोनाच्या महामारीत नांद्रे प्राथमिक आरोग्य केंद्राची चोख कामगिरी!

Archana Banage

तीन आठवडे शाळांना सुटी जाहीर

Patil_p

जम्मू-काश्मीरला योग्यवेळी पूर्ण राज्याचा दर्जा मिळणार

Patil_p

वालकिणी वसाहत – 3 येथील शेतीचा पाणीपुरवठा बंद

Patil_p

कर्नाटकः मुख्यमंत्र्यांची पूर पाहणी दौऱ्यावेळी लसीकरण केंद्राला अचानक भेट

Archana Banage