Tarun Bharat

अन माजी शिक्षण सभापती हादगे यांची सतर्कता

Advertisements

रविवार पेठेतला तो भाग संपूर्ण निर्जंतुक केला

प्रतिनिधी/ सातारा

मुंबई येथून दुचाकीवरून येऊन रविवार पेठेतील स्वातंत्र्य सैनिक कॉलनीत एका खोलीत तरुण आल्याची माहिती माजी शिक्षण मंडळाचे सभापती राम हादगे यांना नागरिकांनी दिली.त्यांनी तातडीने त्याचा त्याच दिवशी शोध घेऊन त्यास पोलीस ठाण्यास माहिती दे,रुग्णालयात तपासणी कर असे बजावले.तो तरुण ही लगेच जिल्हा रुग्णालयात तपासणीकरता दाखल झाला.मात्र,त्याचा अहवाल दि.9रोजी सायंकाळी पॉझिटिव्ह आला.ही माहिती कळताच राम हादगे यांनी वेळीच त्या तरुणाला बजावल्याने अनर्थ टळला म्हणून त्यांचे स्वातंत्र्य सैनिक कॉलनीत त्यांचे कौतुक होत आहे.दरम्यान, नगरसेविका सीता हादगे यांनी तो भाग पालिकेच्या माध्यमातून निर्जंतुक करून घेतला आहे.

कोरोनाचे एवढे भयंकर विळखा वाढत असताना अजून नागरिक कसे ही येतात कसेही जातात. नियम पाळत नाहीत.त्याचाच प्रत्यय सातारा येथील रविवार पेठेतल्या स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतल्या नागरिकांना आला.शहरात बाहेरून आलेलेच नागरिक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत.आणि त्यांच्या संपर्कात आलेले नातेवाईक. त्यामुळे सातारकर मूळचे सतर्क झाले आहेत.स्वातंत्र्य सैनिक कॉलनीत दुचाकीवरून एक युवक मुंबई येथुन आला अन त्याने निवांत कोणाला काही न सांगता खोलीत आराम करत होता.याची माहिती नजीकच्या नागरिकांनी सकाळी सातारा पालिकेचे माजी शिक्षण मंडळाचे सभापती राम हादगे यांना कळवली.राम हादगे यांनी स्वातंत्र्य सैनिक कॉलनीत त्या तरुणांचा शोध घेतला.त्याला खोदून विचारले तर त्याने ही मेडिकल सर्टिफिकेट असल्याचे सांगत दाखवले.हादगे यांनी त्यास हे सर्टिफिकेट खोटं आहे तू पहिला शहर पोलीस स्टेशनला जा.इथं थांबू नको असे बजावले.तेथून हादगे हे घरी जाऊन अंघोळ करून प्रेश झाले.पालिकेत जाऊन याची आरोग्य विभागात माहिती दिली.पालिकेचे दोन कर्मचारी त्या तरुणाचा शोध घेत तेथे पोहचले पण त्यांना पत्ता सापडला नव्हता.तोपर्यंत तो तरुण जिल्हा रुग्णालयात तपासणी करता दाखल झाल्याचे त्यानेच त्यांना सांगितले.तेथून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.मात्र, त्याचा अहवाल आल्याच्या बातम्या दुस्रया दिवशी पाहून हादगे यांनी कुतूहलाने महाबळेश्वर येथील त्यांचे मित्र कूमार शिंदे यांच्याशी विचारणा केली. तेव्हा खरी माहिती त्यांना लगेच उमगली. स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतील तीन तास राहिलेला तो युवक महाबळेश्वरचा नाही तर आपण ज्याच्याकडे चौकशी केली तो आहे हे.त्यावरून लगेच हादगे यांनी कॉलनी पॅक केली आणि निर्जंतुक फवारणी करून घेतली.दरम्यान, त्याच्याशी काही कालावधीकरता चौकशी करण्यासाठी जवळ आल्याने त्यांनी लो रिस्क म्हणून होम कोरोनटाइन स्वतःला करून घेतले आहे.मात्र, नागरिकांनी त्यांनी दाखवलेल्या सतर्कतेबाबत मोठा अनर्थ टळला. नजीक काही पावलाच्या अंतरावर रविवार पेठ भाजी मंडई आहे.तो मंडईत फिरला असता तर अनेकांना वाटप केले असते.मात्र हे हादगे यांच्यामुळे टाळता आल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

Related Stories

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दुकाने उघडण्यास परवानगी द्या

Patil_p

दौलताबाद किल्ल्याचे नाव देवगिरी करणार, पर्यटन मंत्री लोढांची घोषणा

Abhijeet Shinde

महाबळेश्वर येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Abhijeet Shinde

विठोबाराय एसटीने निघाले आळंदीला…

Abhijeet Shinde

सातार्‍यात दारूची दुकाने सुरू होणार?, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Abhijeet Shinde

दरोडय़ाच्या गुह्यातील आरोपीला अटक करण्यात वडुजच्या पथकास यश

Patil_p
error: Content is protected !!