Tarun Bharat

अपघातग्रस्त कंटेनर नदीतून बाहेर काढला

वार्ताहर / पणदूर:

वेताळबांबर्डे येथे सोमवारी रात्री झालेल्या अपघातात नदीत कोसळलेला कंटेनर शनिवारी दुपारी क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला.

सोमवारी हा कंटेनर व मोटारसायकल यांच्यामध्ये अपघात होऊन मोटारसायकलवरील आसोलकर दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर कंटेनर वेताळबांबर्डे पुलावरून पंचवीस फूट खोल नदीत कोसळला होता. आज सकाळपासून क्रेनच्या सहाय्याने कंटेनर नदीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. अखेर दुपारी तो बाहेर काढण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीस केंद्र कसालचे कर्मचारी वाहतूक सुरळीत करीत होते.

Related Stories

कुलभूषणच्या सुटकेसाठी आई-वडिलांनी घातले कालभैरवला साकडे

Patil_p

इस्लामपूरची ‘एक्सपायरी डेट’ प्रथम

NIKHIL_N

इराणस्थित दोन युवक गावी परतले

NIKHIL_N

कणकवली नगराध्यक्षांची कार जप्त

NIKHIL_N

जिह्यातील 1000 सेंद्रीय शेतकऱयांना जागतिक बाजारपेठेचे दरवाजे खुले

Patil_p

सावंतवाडीत ८ जुलै रोजी रक्तदान शिबीर

Anuja Kudatarkar