Tarun Bharat

अपघातात काकती येथील तरुण ठार

407 गुडस् वाहनाची मोटार सायकलला धडक

प्रतिनिधी /बेळगाव

भरधाव 407 गुडस् वाहनाने मोटार सायकलला ठोकरल्याने काकती येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री पुणे-   बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सुतगट्टी जवळ ही घटना घडली आहे.

सिद्राई मन्याप्पा नाईक (वय 24, रा. काकती) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. एमएच 02 एच 8879 क्रमांकाच्या यामहा मोटार सायकलवरुन बेळगावकडे येताना भरधाव गुडस् टेम्पोची मोटार सायकलला धडक बसली. या अपघातात सिद्राई गंभीर जखमी झाला.

त्याला तातडीने खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. आठ दिवसांपूर्वीच या तरुणाने मोटार सायकल घेतली होती. व्यवसायाने तो वाहन चालक होता. आजारी नातेवाईकांना भेटण्यासाठी तो गावी गेला होता. त्यावेळी हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

देवेगौडा तुमकुरूमधून पुन्हा लोकसभा लढवणार निवडणूक

Abhijeet Khandekar

आम्हालाही नुकसान भरपाई द्या

Rohit Salunke

सावधान…पुन्हा कोरोना वाढतोय

Omkar B

आजपासून बँकांचे व्यवहार दुपारी 2 पर्यंतच सुरू

Amit Kulkarni

खासगी कंपनीकडे पाणी पुरवठा नको

Patil_p

उत्तम करिअरसाठी कौशल्यावर भर द्या

Amit Kulkarni