Tarun Bharat

अपघातात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

प्रतिनिधी/ बेळगाव

मोटारसायकलवरून तोल जाऊन खाली पडल्याने पाटील गल्ली-वडगाव येथील महिला गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर उपचार सुरू असताना गुरुवार दि. 30 रोजी मृत्यू झाला आहे.

अनिता अजित पाटील (वय 48, रा. पाटील गल्ली-वडगाव) असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. ती आपल्या मुलासोबत मोटारसायकलवरून जात असताना तोल जाऊन खाली पडली. यामध्ये तिच्या डोक्मयाला गंभीर दुखापत झाली. तिला उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराचा उपयोग न झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद दक्षिण रहदारी पोलीस स्थानकात झाली आहे. अनिता यांच्या पश्चात एक मुलगा आहे. सोमवार दि. 4 रोजी सकाळी 8 वाजता रक्षाविसर्जन होणार आहे.

Related Stories

मनपा निवडणूक जाहीर ; न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष

Amit Kulkarni

चिखले येथे दोन घरे फोडून दोन तोळे सोने – रोख रक्कम लंपास

Amit Kulkarni

करंबळ शाळेचे क्रीडा स्पर्धेत यश

Amit Kulkarni

उडुपीचा नित्यानंद कोटियन ‘मि. कर्नाटक’ किताबाचा मानकरी

Amit Kulkarni

विद्या भारती जिल्हा कार्यशाळा उत्साहात

Amit Kulkarni

पूर ओसरल्याने नाला परिसरातील शेतकऱयांना दिलासा

Amit Kulkarni