Tarun Bharat

अपघातात येळ्ळूरचा तरुण ठार

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगावहून येळ्ळूरकडे जात असताना बळ्ळारी नाल्याजवळ असलेल्या एका झाडाला मोटारसायकलस्वाराने धडक दिली. यामध्ये मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री 10.30 च्या सुमारास घडली आहे.

सूरज नारायण पाटील (वय 27, मूळचा रा. वाघवडे, सध्या रा. येळ्ळूर) असे अपघातातील मयताचे नाव आहे. हा सेंट्रींग कामगार होता. तो काम संपवून रात्री उशिराने येळ्ळूरकडे जात होता. यावेळी रस्त्याशेजारी असलेल्या बाबळीच्या झाडाचा अंदाज आला नाही. त्यामुळे मोटारसायकलची झाडाला धडक बसली. यामध्ये सूरज हा गंभीर जखमी झाला. त्याला काही जणांनी केएलई हॉस्पिटलकडे हलविले. मात्र तो गंभीर असल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून देण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

सूरज याच्या पश्चात आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. या घटनेमुळे गरीब कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. वडील नसल्यामुळे सूरजचे कुटुंबीय आपल्या मामाच्या गावीच राहत होते. सेंट्रींग काम करून सूरज घर सांभाळत होता. मात्र अचानक घडलेल्या या अपघातामुळे हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात झाली आहे.

Related Stories

फिनिक्स चषक स्पर्धेत आरसीसी शिरोडा संघाला दुहेरी मुकुट

Amit Kulkarni

सकाळची बेंगळूर फेरी होणार पूर्ववत

Patil_p

कोरोनाबाबत अफवांवर विश्वास नको

tarunbharat

खानापुरात पाच दिवसांच्या गणरायांना निरोप

Amit Kulkarni

‘त्या’ कंत्राटदाराच्या कुटुंबाला 16 लाखांची मदत

Amit Kulkarni

कै.रावसाहेब गोगटे करेला स्पर्धा 12 मार्च रोजी

Amit Kulkarni