Tarun Bharat

अपघातानंतर रस्त्यावर दारुचे पाट

शिवशाही बसची दारुची वाहतूक करणाऱया टेम्पोला धडक

ओसरगाव येथे थांबला होता टेम्पो

बसच्या धडकेने टेम्पोचा तुटला हौदा

अनेक बाटल्यांचा अक्षरशः चक्काचूर

कणकवली:

गोव्याच्या दिशेने जाणाऱया, दारू वाहतूक करणाऱया आयशर टेम्पोला शिवशाही बसची पाठीमागून धडक बसली. ही धडक एवढी तीव्र होती की, टेम्पोचा हौदा तुटून आतील दारुच्या बाटल्यांचा चक्क रस्त्यावर सडा पडला. हा अपघात महामार्गावरील ओसरगाव येथील टोलनाक्यानजीक मंगळवारी पहाटे 6.30 च्या सुमारास घडला. ही दारु वाहतूक अधिकृत, कायदेशीर होती. ही दारू महाराष्ट्रीयन बनावटीची होती, असेही पोलिसांनी सांगितले.

टेम्पो चालक किरण धनाजी कांबळे (23, रा. तळाशी, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) हे आयशर टेम्पो (एमएच 04 एफजे 9271) घेऊन कोल्हापूर – शिरोली येथून कुडाळ येथे जात होते. त्यांच्यासोबत प्रवीण मधुकर कांबळी (रा. आवळी, ता. राधानगरी) होते. सकाळी 6.30 च्या सुमारास ते ओसरगाव येथे चहा पिण्यासाठी थांबले. त्यासाठी त्यांनी महामार्गाच्या कडेला टेम्पो उभा केला. याचवेळी पुण्याहून पणजीच्या दिशेने जात असलेल्या, चालक भरत शंकर कदम (40, रा. सुभाषनगर, कोल्हापूर) चालवित असलेल्या शिवशाही बसची (एमएच 14 जीयू 2448) टेम्पोला जोरदार धडक बसली.

धडकेत टेम्पोचा हौदा तुटला. परिणामी आतील दारूच्या बाटल्यांचा ढिग भराभर रस्त्यावर कोसळला. त्यामुळे रस्त्यावर बाटल्या, काचांचा सडा पडला होता. अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलीस, कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

अपघाताबाबत टेम्पोचालक किरण कांबळे यांच्या फिर्यादीनुसार बसचालक भरत कदम याच्याविरोधात रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

Related Stories

सिंधुदुर्गच्या ”पीटी उषाचा” पुन्हा एकदा मॅरेथॉन स्पर्धेत डंका

Anuja Kudatarkar

दिव्यांगांच्या रॅम्प बांधणीकडे दुर्लक्ष

NIKHIL_N

सिंधुदुर्ग ते गोवा ओव्हरलोड खडी वाहतुकीमुळे महसूल बुडतो, साईप्रसाद राणे यांची कारवाईची मागणी

Tousif Mujawar

खेडमध्ये 20 दिवसांत डेंग्यूचे अर्धशतक

Patil_p

सावंतवाडीच्या जगन्नाथराव भोसले उद्यानात महिलांसाठी एकदिवसीय योगाभ्यास व योगा स्पर्धा आयोजन

Anuja Kudatarkar

टिका करताना स्तर सांभाळा !

Patil_p