Tarun Bharat

अपत्यानि लावले आपल्या आईचे लग्न

आपल्या घटस्फोटीत आईचे लग्न तिचा मुलगा आणि मुलगी यांनी लावून दिल्याची घटना नुकतीच घडली आहे. या आईचे नाव सोनी असे असून मुलीचे नाव श्रेया आणि मुलाचे नाव समीर असे आहे. सोनी यांचे लग्न वयाच्या 18 व्या वर्षीच झाले होते. पण सासरी त्यांचा छळ होत होता. लग्नानंतर चार वर्षांत त्यांना ही मुले झाली. तरीही त्यांचे हाल संपत नव्हते. अखेर त्यंनी आपल्या मुलांसह पतीचे घर सोडण्याचा निर्णय घेऊन घटस्फोट घेतला.

त्यावेळी ही दोन्ही मुले खूपच लहान होती. घटस्फोटीत मातेने मोठय़ा कष्टाने या मुलांना मोठे केले, शिकविले आणि स्वतःच्या पायावर उभे केले. सोनी यांच्या माहेरच्या लोकांनी त्यांना फारसे साहाय्य केले नाही. श्रेया आता 17 वर्षांची असून आपल्या आईबद्दल तिला रास्त अभिमान आहे. आपली आई ही ‘शेरणी’ आहे असे ती अभिमानाने सांगते. आईच्या एकटेपणाची व्यथा श्रेया आणि तिच्या भावाने चांगलीच जाणली होती. सोनी यांना पहिल्या लग्नाचा अनुभव अतिशय क्लेशकारक आल्याने एकंदर पुरुष जातीबद्दलच त्यांना तिरस्कार वाटू लागला होता. मात्र, श्रेया यांनी आपल्या आईचे मन बदलले. आईलाही एका आयुष्यभराच्या सहकाऱयाची आवश्यकता आहे हे तिने जाणले आणि आपल्या आईला लग्नासाठी तयार केले. नंतर सोनी यांचे लग्न त्यांनी ठरविले. या लग्नाला सोनी यांच्याकडून श्रेया आणि समीर अशा दोनच व्यक्ती उपस्थित होत्या. आईला तिचा जीवनसाथी मिळवून दिल्याचा आनंद श्रेया भरभरून व्यक्त करते. आईने आपली एकटेपणाची व्यथा कधीच बोलून दाखविली नव्हती. आम्ही ती जाणू शकलो आणि त्यावर उपायही शोधू शकलो याचा सार्थ अभिमान आम्हा बहीण भावंडांना आहे, असे श्रेया सर्वांना अतिशय गर्वाने सांगतात.

Related Stories

भावी जावयाचे अनोखे आदरातिथ्य

Patil_p

नव वर्षाच्या शुभेच्छा देताना “तुका म्हणे” शब्दाचा वापर करण्यास बंदी !

Rohit Salunke

रस्त्यावर माकडांदरम्यान गँगवॉर

Patil_p

खाऱया पाण्याने पेटणारा कंदिल

Amit Kulkarni

महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तींची धान्यतुला व सोने-चांदी पुष्पअर्पण

Tousif Mujawar

4 वर्षीय चिमुरडीकडून पुनर्जन्माचा दावा

Patil_p