Tarun Bharat

अफगाणिस्तानमध्ये तातडीने लक्ष घालून युद्धबंदी करावी, मलालाचं जागतिक महासत्तांना आवाहन

ऑनलाईन टीम

अफगाणिस्तानवर तालिबाने कब्जा केला आहे. तालिबानने रविवारी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी काल, रविवारी संध्याकाळीच देश सोडला आहे. फेसबुकवर रात्री उशिरा त्यांनी याबाबत माहिती दिली. लोकांना जास्त रक्तपात पाहावा लागू नये म्हणून आपण अफगाणिस्तानातून पळून गेलो, असे घनी यांनी म्हटले आहे. यामुळे अफगाणिस्तानमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. नागरिक मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत आहे.

या संपूर्ण कोलाहलावर शांततेचं नोबेल पुरस्कार जिंकलेल्या मलाला युसूफझईने आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यासाठी ते सारं बघणं प्रचंड धक्कादायक होतं, असं म्हणतानाच मलाला युसूफझईनं एक विनंती केली आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करत मलालाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“तालिबान अफगानिस्तानवर ताबा मिळवत असल्याचं बघून आम्हाला प्रचंड धक्का बसला. मी तिथल्या महिला, अल्पसंख्य आणि मानवी अधिकार कार्यकर्त्यांविषयी खूप चिंतेत आहे. जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक सत्तांनी अफगाणिस्तानमध्ये तातडीने लक्ष घालून युद्धबंदी करावी. अफगाणिस्तानमध्ये मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करावी आणि नागरिकांना व निर्वासितांना संरक्षण द्यावं”, असं मलाला युसूफझईने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मलालाने तालिबानशी दीर्घकाळ वैचारिक संघर्ष केला आहे.

Related Stories

स्पेनमध्ये निदर्शने

Patil_p

बेळगावसह राज्यातील तीन महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं

Archana Banage

मुंबईतील 93 च्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी 4 अटकेत

datta jadhav

प्लास्टिक सर्जरीद्वारे गालांवरील चरबी हटविण्याचा ट्रेंड

Patil_p

शिरोळ पंचायत समिती : उपसभापती मन्सूर मुल्लाणी यांचा राजीनामा; संजय माने यांची निवड निश्चित

Abhijeet Khandekar

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह

datta jadhav