Tarun Bharat

अफगाणिस्तानातील स्थितीवर पीएम मोदींनी केली पुतिन यांच्याशी चर्चा

Advertisements


नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

अफगाणिस्तानातील स्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. जवळपास ४५ मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाला.

माझी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्याशी अफगाणिस्तानातील स्थितीवर चर्चा झाली. तिथल्या घडामोडींवर आम्ही सविस्तर मुद्दे मांडले आणि विचार विनिमय केला. त्याचबरोबर करोनाविरुद्धच्या लढाईत दोन्ही देशांच्या द्विपक्षीय अजेंड्यावरही चर्चा केली. यापुढेही महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होत राहतील”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

अफगाणिस्तानातून डोकं वर काढणारी दहशतवादी विचारधारा आणि अंमली पदार्थांची तस्करी याचा संभाव्य धोका पाहता दोन्ही देशात चर्चा झाली. यासाठी दोन्ही देशांनी एक स्थायी द्विपक्षीय तोडगा काढण्याचं मान्य केलं आहे, असं रशियन सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

Related Stories

कोरोनाबाधितांची संख्येत वाढ सुरूच

Patil_p

कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारताकडून हालचाली सुरू

Rohan_P

Vice President Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती

Abhijeet Shinde

सीबीआय कार्यालयांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसवा

Omkar B

महाराष्ट्र : मागील 24 तासात 69,710 जणांना डिस्चार्ज!

Rohan_P

भाजपमध्ये जाणार नाही, काँग्रेसमध्ये राहणार नाही!

Amit Kulkarni
error: Content is protected !!