Tarun Bharat

अफगाणिस्तानातील हिंसाचारात 11 जणांचा मृत्यू ; 39 जखमी

ऑनलाईन टीम / काबुल : 

अफगाणिस्तानातील कुंदुज शहरात हिंसाचार उसळला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला असून, 39 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुंदुज सार्वजनिक आरोग्य संचालनालयाचे प्रमुख एहसानुल्ला फजली यांनी ही माहिती दिली. 

अफगाणिस्तानात तालिबानचे वर्चस्व वाढत आहे. अमेरिकी सैन्य मागे घेतल्यानंतर तालिबान अफगाणिस्तानात वेगाने आपले प्रस्थ वाढवत आहे. तालिबानने अफगाणिस्तानची दुसरी प्रांतीय राजधानी शेबर्गन शहरही ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. तालिबानने यापूर्वीच अफगाणिस्तानातील अनेक भागांचा ताबा घेतला आहे.

Related Stories

ब्रिटन-चीन संबंधांचा सुवर्णकाळ संपुष्टात

Patil_p

अत्यंत विचित्र आहेत व्यक्तीचे हात

Patil_p

ऑस्ट्रेलियाचा प्रवास टाळा : चीन

Patil_p

मॉडेलच्या एका दाताची किंमत लाखांमध्ये

Patil_p

सोलोमन बेटांवर आढळला बालकाच्या आकाराचा बेडूक

Patil_p

ब्राझीलकडून ‘कोवॅक्सिन’ लस खरेदीला स्थगिती

datta jadhav