Tarun Bharat

अफगाणिस्तानात IPL च्या प्रसारणावर बंदी

Advertisements

ऑनलाईन टीम / काबुल :

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 14 व्या सत्रातील दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू झाला आहे. पुन्हा सुरू झालेल्या या लीगमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत. सर्वात लोकप्रिय असलेल्या या टी-20 लीगच्या प्रसारणावर अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने बंदी घातली आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी मीडिया मॅनेजर एम इब्राहिम मोमंड यांनी या प्रकरणाबद्दल ट्विट केल आहे. ते म्हणाले की, तालिबानच्या मते आयपीएलमध्ये इस्लामविरोधी गोष्टी दाखवल्या जातात, स्त्रिया आपले केस न झाकताच स्टेडियममध्ये जातात आणि मुली (चीअरलीडर) येथे नाचतात आणि म्हणूनच त्याच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली आहे.

अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबान तेथील महिलांच्या हक्कांविरुद्ध काम करत आहे. तालिबानने क्रीडा क्षेत्रात महिलांच्या सहभागावर बंदी घातली आहे. शिवाय, सत्तेची चणचण असलेल्या अफगाणिस्तानात आता बहुतेक करमणुकीच्या उपकरणांवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, आयपीएलमध्ये तीन अफगाण क्रिकेटपटू सहभागी आहेत. अफगाणिस्तानचा स्टार स्पिनर रशीद खान, अष्टपैलू नबी आणि युवा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमान हे सनरायझर्स हैदराबादचा भाग आहेत.

Related Stories

संयुक्त अरब अमिरातचा आयर्लंडवर विजय

Patil_p

बेंगळूर एफसीची विजयाने सांगता

Patil_p

सोलापूर : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रिडा मार्गदर्शक, क्रिडा पत्रकारांचा सन्मान

Archana Banage

जेरेमीची ऑलिम्पिक संधी थोडक्यात हुकली

Patil_p

भारतीय महिला बुद्धिबळ संघाचे संमिश्र यश

Patil_p

भारत-न्यूझीलंड पहिली टी-20 आज

Patil_p
error: Content is protected !!