Tarun Bharat

अफगाणिस्तान – भारत, अमेरिका, रशियाच्या संपर्कात

अमेरिकेला भारताच्या साहाय्याची अपेक्षा,  नव्या सरकारसंबंधी जगाची सावध भूमिका

अफगाणिस्तानात तालिबानने अंतरिम सरकार स्थापन केले आहे. तथापि, या सरकारकडे जग संशयाने पहात असल्याचे दिसून येते. या सरकारला घाईगडबडीने मान्यता देण्याची चूक करु नका, असे आवाहन तुर्कस्थानने केले आहे, तर हे सरकार अपेक्षेप्रमाणे बनलेले नाही, अशी प्रतिक्रिया जर्मनीने व्यक्त केली. सध्याच्या परिस्थितीत भारत काय करणार, याकडे जगाचे लक्ष लागले असल्याचे दिसून येत आहे. भारतही सातत्याने अमेरिका आणि रशियाच्या संपर्कात आहे.

मंगळवारी अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संस्थेचे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची दिल्लीत भेट घेतली होती. भारताने दक्षिण आशिया परिसरातील सुरक्षेसंबंधीची गुप्त माहिती अमेरिकेला देऊन मोठे उत्तरदायित्व स्वीकारावे, अशी गळ बर्न्स यांनी घातल्याचे समजते. काही  अफगाण नागरिकांना भारताने आपल्याकडे आश्रय द्यावा, अशीही मागणी त्यांनी केल्याचे सांगण्यात येते. अफगाणिस्तानमधून अमेरिकेने सैन्य काढून घेतल्यानंतरची तेथील परिस्थिती, तालिबान सरकारची स्थापना आणि घटनाक्रम तसेच त्या देशातून लोकांची सुटका, तेथे अडकलेल्या लोकांची सुरक्षा आदी मुद्दय़ांवर अमेरिकेच्या शिष्टमंडळाची डोभाल यांच्याशी चर्चा झाली आहे.

रशियाची भारताशी चर्चा

बुधवारी रशियाचे सुरक्षा मंडळ प्रमुख निकोलाय पेट्रेशेव्ह आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यग्नात अफगाणिस्तान परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेतही गुप्त माहितीच्या आदान-प्रदानावर भर देण्यात आला. तत्पूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यग्नांच्यात याच विषयावर टेलिफोनवर चर्चा झाली होती. सुरक्षेच्या संदर्भातील द्विपक्षीय सहकार्य तसेच दहशतवादविरोधी कारवायांना प्राधान्य देणे, बेकायदेशीर स्थलांतर आणि अंमली पदार्थांची अवैध विक्री रोखणे यावरही विस्तृत चर्चा झाल्याचे रशियाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

अफगाणिस्तान स्थितीवर लक्ष

अफगाणिस्तानातील भविष्यकालीन सरकार तेथील लोकांनीच निर्माण केलेले असावे, अशी विश्वसमुदायाची इच्छा आहे. तसेच त्या देशात हिंसाचारावर लवकरात लवकर नियंत्रण मिळविले जावे, त्या देशातील सामाजिक आणि वांशिक अनागोंदी संपावी, यासाठी संयुक्तरित्या प्रयत्न करण्याचाही निर्णय भारत आणि रशियाने घेतला. यावर नंतरही आणखी चर्चा होणार आहे.

भारताचा तालिबानशी संपर्क

भारताने काही दिवसांपूर्वी तालिबानशी संपर्क साधला आहे. तालिबानमुळे जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा या काश्मीरमधील दहशतवादी संघटनांचे बळ वाढू नये, अशी भारताची इच्छा असून त्यासाठी हा संपर्क करण्यात आला. रशियाशी झालेल्या चर्चेतही भारताची या संदर्भातील भूमिका स्पष्ट करण्यात आली.

नव्या सरकारसंबंधी चिंता

अफगाणिस्तानच्या नव्या सरकारमध्ये अनेक मंत्री असे आहेत की, ज्यांना पकडून देण्यासाठी अमेरिका व विविध देशांनी पुरस्कार घोषित केले आहेत. त्यांचा दहशतवाद आणि हिंसाचारात हात असल्याचा आरोप आहे. ज्यांच्यावर आंतरराष्ट्रीय निर्बंध घोषित करण्यग्नात आले आहेत, त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे या नव्या सरकारसंबंधी जगात संशय बळावला असून तालिबान आश्वासने पूर्ण करणार नाही ही भावना वाढीस लागली आहे. भारत आणि रशिया यांच्यात झालेल्या चर्चेत हे मुद्देही उपस्थित झाले आहेत.

भारताचे महत्व वाढणार

ड अफगाणिस्तानमधील परिस्थितीत भारताची भूमिका महत्वाची ठरणार

ड अमेरिका व रशिया यग्ना मोठय़ा देशांच्यग्नाही भारताकडून मोठय़ा अपेक्षा

ड नव्या अफगाण सरकारला मान्यता देण्यास बहुतेक देशांची टाळाटाळ ड नव्या सरकारला विनाविलंब

Related Stories

देशभरात ‘चक दे इंडिया’! इतिहासाची नोंद केलेल्या भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव

Tousif Mujawar

विधानपरिषद निवडणूक : नागपूर, अकोल्यात भाजपची मुसंडी

datta jadhav

बाबुल सुप्रियो तृणमूलमध्ये दाखल

datta jadhav

”अकाऊंट लॉक केले यामध्ये ट्विटरचा दोष आहेच मात्र यापेक्षा जास्त दोष भाजप आणि केंद्र सरकारचा”

Archana Banage

अमेरिकेच्या सर्जनांच्या कामगिरीने जग अवाप्

Patil_p

अमेरिकेत गुजराती युवकाची हत्या

Patil_p