Tarun Bharat

अफगाण मुद्यावर दिल्लीत NSA ची बैठक; पाकलाही निमंत्रण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अफगाणिस्तान मुद्यावर दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची (NSA) बैठक होणार आहे. या बैठकीसाठी 10 आणि 11 नोव्हेंबर या तारखा प्रस्तावित करण्यात आल्या असून, अजित डोवल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल.

या बैठकीसाठी पाकिस्तान, चीन, इराण, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोइड युसूफ यांना गेल्या आठवडय़ात या बैठकीचे निमंत्रण मिळाल्याची पुष्टीही पाकिस्तानी सूत्रांनी केली आहे. तालिबान सरकार स्थापन झाल्यापासून अमेरिका, रशिया आणि चीन सारख्या अनेक प्रमुख देशांची सातत्याने बैठक होत आहे. त्याच दृष्टीने भारताने दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक बोलावली आहे. दरम्यान, भारत सरकारने अद्याप तालिबानला दिल्लीतील बैठकीसाठी आमंत्रित केले नाही. याचे कारण म्हणजे तालिबानने अद्याप आंतरराष्ट्रीय बंधुत्वाच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत.

बैठकीत या मुद्यांवर होणार चर्चा

या बैठकीत अफगाणिस्तानातील मानवतावादी संकट आणि मानवी हक्कांच्या मुद्यावर चर्चा होईल. याशिवाय सुरक्षेच्या मुद्यांवरही चर्चा केली जाईल. अफगाणिस्तानकडून जगाला असलेल्या अपेक्षांची माहिती तालिबानलाही दिली जाईल. तालिबान सरकारच्या राजवटीवरही तसेच महिलांच्या सुरक्षा आणि शिक्षणावरही चर्चा होणार आहे.

Related Stories

रामनगरी अयोध्येत भाविकांचा महापूर

Patil_p

उत्तराखंडात दिवसभरात 200 नवे कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

मेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत

datta jadhav

बिहार : राजद नेता रघुवंश प्रसाद सिंह यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

बुंदेली महिलांची व्यवसायात भरारी

Patil_p

माझे क्षेत्र, माझे नियम

Patil_p