Tarun Bharat

अबकारी विभागाच्या कारवाईत 50 लाखांचा दारुसाठा जप्त

प्रतिनिधी / बेळगाव :

लॉकडाऊनच्या काळात बेकायदा व गावठी दारू विक्रीचे प्रकार वाढले आहेत. हे प्रकार थोपविण्यासाठी अबकारी विभागाने जिल्हय़ातील विविध भागात 530 ठिकाणी छापे टाकून 50 लाखांचा दारुसाठा व 51 वाहने जप्त केली आहेत.

अबकारी अधिकाऱयांनी गुरुवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. कोरोना थोपविण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. याच संधीचा फायदा घेत गावठी व बेकायदा दारुविक्री करणाऱयांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

24 मार्चपासून आतापर्यंत 63 प्रकरणे दाखल करण्यात आली असून 34 जणांना अटक करून त्यांच्याजवळून 4 हजार 662.695 लिटर बेकायदा दारुसाठा, 27 लिटर गोवा दारू, 10.170 लिटर महाराष्ट्रातील दारू, 1207.200 लिटर बियर, 40 लिटर शिंदी, 50 लिटर गुळाचे रसायन, 33.530 लिटर संत्रा, 74 लिटर काजू, 1014.900 लिटर गावठी दारू, 7.400 लिटर वाईन जप्त करण्यात आली आहे.

या कारवाईत 45 दुचाकी, दोन ऑटोरिक्षा, एक कार, तीन गुड्स वाहने अशी एकूण 51 वाहने अधिकाऱयांनी जप्त केली असून त्यांची किंमत 21 लाख रुपये इतकी होते. तर जप्त दारुसाठय़ाची किंमत 50 लाख रुपये इतकी होते, अशी माहिती अबकारी अधिकाऱयांनी दिली.

Related Stories

वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविली

Patil_p

गोगटे कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

Amit Kulkarni

कोरोनाच्या धास्तीत ‘लगीन’घाई ठरतेय धोकादायक

Amit Kulkarni

अंतरजल वाढविण्यासाठी अधिकाऱयांनी काम करावे

Patil_p

राजहंसगडाचे सुशोभिकरण प्रगतिपथावर

Amit Kulkarni

पंचांगकर्ते मोहनराव दाते यांचा तरुण भारत संवादतर्फे सत्कार

Amit Kulkarni