Tarun Bharat

अबकी बार करोडो बेरोजगार…म्हणत राहुल गांधींनी साधला मोदी सरकारवर निशाणा

नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

देशातील कोरोना स्थितीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधता असतात. आता देखील त्यांनी राहुल गांधी यांनी देशातील वाढत्या बेरोजगारीवरून ‘अबकी बार करोडो बेरोजगार’, असे म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

”अबकी बार करोडो बेरोजगार, कोण जबाबदार? फक्त आणि फक्त मोदी सरकार”, असं ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. तसेच ‘#अबकी बार करोडो बेरोजगार’ यासाठी हॅशटॅग देखील त्यांनी वापरला आहे.यासोबतच काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या आपल्या ट्विटर हॅण्डलमुळे चर्चेत आहेत. राहुल गांधी यांनी एकाच दिवसात पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेते, निकटवर्तीय आणि पत्रकारांना अनफॉलो केलं आहे. यानंतर राजकीय अटकळ बांधण्यास सुरुवात झाली आहे. परंतु राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट रिफ्रेश केलं जात आहे, त्यामुळे अनेक अकाऊंट अनफॉलो केल्याचं पक्षाने म्हटलं आहे. रिफ्रेशची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा फॉलो केलं जाईल, असं पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे.

Related Stories

मुंबई कस्टमची मोठी कारवाई, २७ किलो ड्रग्स जप्त

Archana Banage

Special Story; रणजी ट्रॉफी : मध्यप्रदेशचा बलाढ्य मुंबईवर विजय

Kalyani Amanagi

OBC RESERVATION : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी लांबणीवर

Archana Banage

आम्ही खोके घेत असताना तुम्ही नामर्द होता का?; ‘५० खोके, एकदम ओके’च्या घोषणा देणाऱ्या विरोधकांना बच्चू कडूंचा सवाल

Archana Banage

केंद्राने AFSPA अंतर्गत क्षेत्र केले कमी

Abhijeet Khandekar

सहा दहशतवाद्यांचा खात्मा दोन जवानांना हौतात्म्य

Amit Kulkarni