प्रतिनिधी/ सातारा
कराड तालुक्यात कोरोना प्रार्दुभाव धक्कादायकपणे वाढत आहे. शुक्रवारी रात्री आलेल्या अहवालात तब्बल 53 जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने चिंता वाढली आहे. यामधे सात बालकांचा समावेश असून कराडकरांनी सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान मलकापूर येथील 45 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला असून त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला आहे. मात्र मलकापुरात पुन्हा एकदा घबराट पसरली आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालात कराड तालुक्यातील सैदापूर येथील 47 वर्षीय महिला, 25 वर्षाचा पुरुष, शेणोली येथील 25 वर्षाचा पुरुष, किवळ येथील 65 वर्षाचा पुरुष, 55 वर्षाची महिला, 34 महिला, 10 वर्षाचा मुलगा, 13 वर्षाची मुलगी, कालगाव येथील 28 वर्षाचा पुरुष, 28 वर्षाची महिला, 65 वर्षाचा पुरुष, 28 वर्षाचा पुरुष, येवती येथील 24 वर्षाचा पुरुष, शामगाव येथील 21 वर्षाचा पुरुष, 42 वर्षाची महिला, रविवार पेठ, कराड येथील 42 वर्षाचा पुरुष, मासोली येथील 30 वर्षाचा पुरुष, सैदापूर येथील 62 वर्षाचा पुरुष, 56 वर्षाची महिला, 28 वर्षाची महिला, 8 वर्षाची बालिका, शुक्रवार पेठ, कराड 70 वर्षाचा पुरुष, कार्वे येथील 32 वर्षाची महिला, वडगाव हवेली येथील 37 वर्षाचा पुरुष, गोटे येथील 67 वर्षाचा पुरुष, कालवडे येथील 65 वर्षाची महिला, कालवडे येथील 42 वर्षाची महिला, गुरुवार पेठ, कराड 27 वर्षाची महिला, मलकापूर येथील 53 वर्षाची महिला, कालवडे येथील 6 वर्षाचा बालक, कार्वे येथील 64 वर्षाची महिला, शुक्रवार पेठ, कराड 40 वर्षाची महिला, गोंडी येथील 40 वर्षाचा पुरुष, कार्वे येथील 6 वर्षाचा बालक, कालवडे येथील 30 वर्षाची महिला, शुक्रवार पेठ कराड येथील 34 वर्षाची महिला, 38 वर्षाची महिला, 12 वर्षाचा मुलगा, 40 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 65 वर्षाचा पुरुष, गुरुवार पेठ, कराड 40 वर्षाचा पुरुष, शुक्रवार पेठ, कराड 64 वर्षीय महिला, 6 वर्षाचा बालक, मलकापूर येथील 28 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 40 वर्षीय पुरुष, आटके येथील 59 वर्षीय पुरुष, 82 वर्षीय महिला, 90 वर्षाचा पुरुष, 54 वर्षीय महिला, 26 वर्षीय महिला, येवती येथील 75 वर्षीय पुरुष, शामगाव येथील 88 वर्षीय पुरुष, कराड येथील 45 वर्षीय पुरुष बाधित आले आहेत. यामधे सात बालकांचा समावेश आहे. या सर्वांवर कृष्णा रूग्णालय, सह्याद्री रूग्णालय, एरम हॉस्पीटल व पार्ले येथील विलिगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. कराड तालुक्यात कोरोनाचा कहर वाढला असून आजपर्यंत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात रूग्ण वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे. रूग्णांची हिस्ट्री काढण्यात प्रशासन व्यस्त आहे. शिवाय रूग्णांच्या निकट सहवासितांना विलिगिकरणात दाखल करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू होती. रूग्णांशी संपर्क आलेल्या अनेकांना होम क्वारंटाईन करण्यात येत होते. अचानक एवढी रूग्ण संख्या वाढल्याने कराड तालुका आरोग्यविभाग, पोलीस, ग्रामपंचायती, नगरपालिकांवरील ताण चांगलाच वाढलेला होता.