Tarun Bharat

अबोल प्रेमाचा रांगडा बाज ‘जीव माझा गुंतला’

आ ग आणि पाणी कधीच एकत्र येऊ शकत नाही पण त्यांनी सोबत असण गरजेचं असतं म्हणजेच एकमेक एकमेकांवर हावी होत नाही. अगदी तसंच आयुष्याचाही समतोल साधायचा असेल तर असे दोन परस्परविरुध्द, भिन्न स्वभावाची व्यक्तिमत्त्वं असणं हीदेखील सहजीवनाची गरज असते. हाच वेगळेपणा त्यांच्या प्रेमात एक रांगडा बाज घेऊन येतो, मग अशा प्रेमाला व्यक्त व्हायला शब्द देखील अपुरे पडतात. हाच अबोल प्रेमाचा रांगडा बाज घेऊन येत आहेत अंतरा आणि मल्हार. जी व्यक्ती समोर आली तरी नकोशी वाटते, जिच्याबद्दल मनामध्ये पराकोटीचा तिरस्कार आहे तिच्यासोबतच साता जन्माच्या गाठी जुळल्या तर ? असा कुठला नात्यांचा गुंता उद्धभवतो ज्यामुळे अंतराबद्दल मनात द्वेष असलेला मल्हार लग्नासाठी तयार होतो.  ‘जीव माझा गुंतला’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे 21 जूनपासून रात्री 9.30 वा.  कलर्स मराठी वाहिनीवर येणार आहे.  कोल्हापुरातील शितोळेंच्या घरात वाढलेली अंतरा देखील अगदी अशीच आहे. सगळय़ांच्या मनाचा विचार करणारी, अत्यंत स्वाभिमानी, संस्कारी, आणि मेहनती.  असल्यामुळे कष्ट आणि संघर्ष तिच्या पाचवीला पुजले आहेत. घरातील एकटी कमावती अंतरा ऑटो रिक्षा चालवून घर सांभाळते. तर, दुसरीकडे मल्हार आईचा लाडका, श्रीमंत व्यावसायिक. त्याच्यासाठी पैसा खूप महत्वाचा आहे.  व्यवहार ही प्राथमिकता असल्यामुळे उगाच भावनेत अडकणारा वा हळवा अजिबात नाही. असे परस्परविरोधी मल्हार आणि अंतरा लग्न बंधनात अडकल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते. नात्यांचा गुंता आणि पराकोटीचा द्वेष यामध्ये या दोघांचं नातं कुठलं वळण घेईल हे अनुभवणं रंजक असणार आहे.

Related Stories

ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे निधन

Abhijeet Shinde

सुपरस्टार रजनीकांत यांनी घेतला मोठा निर्णय; केली ‘ही’ घोषणा

Abhijeet Shinde

आता रश्मी अनपट दिसणार आर्याच्या भूमिकेत!

Rohan_P

छोटय़ा पडद्यावर संजय जाधव यांची एन्ट्री

Patil_p

‘बॅक टू स्कूल’

Patil_p

नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोनाची बाधा

Rohan_P
error: Content is protected !!