Tarun Bharat

अब्जाधीशांचा ‘समर कँप’ सुरू

बफेट-बेजोससह अनेक दिग्गजांसह सहभाग, सनव्हॅलीतील इदाहो रिसॉर्टमध्ये 5 दिवस वास्तव्य

अमेरिकेतील ग्रामीण भाग इदाहोमध्ये सध्या प्रायव्हेट जेट्सची गर्दी दिसून येते. येथील साउथोथ राष्ट्रीय उद्यानातील खासगी रिसॉर्ट ‘सनव्हॅली’मध्ये सोमवारपासून जगभरातील अब्जाधीशांची वार्षिक परिषद सुरू झाली आहे. याला ‘बिलेनियर समर कँप’ असेही म्हटले जाते. यात तंत्रज्ञान, मीडिया, चित्रपट, क्रीडा आणि अन्य उद्योगाशी संबंधित दिग्गज सामील होतात.

वॉरेन बफेट, जेफ बेजोस, अमेझॉनचे नवे सीईओ अँडी जेसी, ऍपलचे टिम कुक, फेसबुकचे मार्क जकरबर्ग, डिस्कव्हरीचे सीईओ डेव्हिड जॅसलव, 20 सेंच्युरी फॉक्सचे उपाध्यक्ष जॉन नॅलन, निकी हेली आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्यासह अनेक दिग्गज येथे पोहोचले आहेत.

सध्या इदाहोच्या फ्राइडमॅन मेमोरियल विमानतळावर बिझनेस जेट्सची गर्दी असून एक आठवडय़ापर्यंत ही विमाने येथेच पार्क असतील. येथून अतिथींना 15 किलोमीटर अंतरावर पर्वतांनी वेढलेल्या सनव्हॅली रिसॉर्टमध्ये नेण्यात आले आहे. परिषदेसाठी पुढील 5 दिवसांपर्यंत सर्व दिग्गज येथे राहतील आणि उद्योगाची रणनीति आखतील. या सर्व अतिथींसाठी लसीकरण अनिवार्य आहे. या समर कँपचे आयोजन इन्व्हेस्टमेंट बँक एलन अँड कंपनी करते.

शांत परिसर

गोंगाटपासून दूर इदाहो ग्रामीण भाग असून याची लोकसंख्या केवळ 1500 आहे. कृषी आणि डेअरी फार्म हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. 1982 मध्ये येथे पहिल्यांदा अशाप्रकारच्या परिषदेचे आयोजन हर्बर्ट एलन यांनी केले हेते.

Related Stories

नेपाळमध्ये भूस्खलनात 17 ठार, 6 बेपत्ता

Patil_p

हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या ट्रायलला बंदी : WHO

datta jadhav

गाझावरील हल्ल्यात एपीची इमारत उध्वस्त

Patil_p

मेक्सिकोत कोरोनाने घेतले 1.80 लाख बळी

datta jadhav

संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत तालिबानला नो एंट्री

Amit Kulkarni

मुत्सद्दी कीव्हमध्ये परतल्यास याद राखा

Patil_p