Tarun Bharat

अब्जाधीश ऍलन मस्क यांचा लस घेण्यास नकार

Advertisements

विषाणूचे भय अधिक पसरले आहे : संसर्ग नियंत्रणासाठी लागू सरसकट टाळेबंदीचा निर्णय चुकीचा असल्याचे मत व्यक्त

पूर्ण जगाच अर्थव्यवस्था कोविड-19 मुळे मंदीत सापडलेली असताना लसीची आतुरतेने प्रतीक्षा केली जात आहे. अशा स्थितीत अमेरिकेतील अब्जाधीश उद्योजक ऍलन मस्क यांनी आपण आणि माझी मुले लस घेणार नसल्याचे म्हणत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या विषाणूला अतिशयोक्तीने सादर करण्यात आले असून त्यापासून घाबरण्याची गरज नसल्याचा त्यांचा दावा आहे.

स्पेस एक्स, टेस्ला आणि न्यूरलिंकचे संस्थापक असलेले मस्क जगभरात ओळखले जातात. मला तसेच माझ्या कुटुंबाला विषाणूचा धोका नाही, असे मस्क यांनी म्हटले आहे. याचबरोबर हा विषाणू रोखण्याच्या उपाययोजनांवर त्यांनी यापूर्वीही नाराजी व्यक्त केली आहे.

मस्क यांनी अमेरिकेसह जगभरात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीप्रकरणी नाराजी व्यक्त केली होती. विषाणूची अतिशयोक्तीपूर्ण भीती निर्माण करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांना अनेकांचा जीव गेल्याची आठवण करून दिल्यावर मस्क यांनी ज्यांनी जन्म घेतलाय तो मरणार देखील, असे अजब उत्तर दिले आहे.

महामारीमुळे अंतराळ संशोधन कंपनी स्पेसएक्सचे काम एक दिवसही प्रभावित झालेले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. महामारीत स्पेसएक्सने नासाच्या अंतराळवीरांना अंतराळात पाठविले. असा मान मिळविणारी ही पहिली खासगी कंपनी ठरली आहे.

टाळेबंदी लागू करून सर्वांना घरी बसविणे चांगली कल्पना नाही. जोखीम असलेल्यांना हे संकट संपेपर्यंत विलगीकृत करणे गरजेचे होते. सर्वांना घरी बसविण्याची गरज नव्हती. परंतु जे झाले ते झाले. आता या प्रकरणी घाबरण्याची गरज नसल्याचे मस्क यांचे म्हणणे आहे.

Related Stories

पाक सैन्याच्या विरोधात पोलिसांचं बंड

Omkar B

सत्य लपविण्यासाठी चीनकडून आटापिटा

Patil_p

एक लाख ग्रीन कार्ड वाया जाण्याची शक्यता

Patil_p

पैज पूर्ण करण्यासाठी धावले 400 किलोमीटर

Patil_p

पर्सिव्हरेन्स रोव्हरचे लाल ग्रहावर मार्गक्रमण

Patil_p

कासवाने गाठली शंभरी

Patil_p
error: Content is protected !!