Tarun Bharat

अब्जावधींचा रोजगार धोक्यात

Advertisements

. अमेरिकेत रुग्णसंख्या 4 लाखांवर

अमेरिकेत आता कोरोनाबाधितांची संख्या 400549 झाली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क प्रांतात सर्वाधिक संकट असून मंगळवारी तेथे 800 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये 1 लाख 40 हजार रुग्ण सापडले आहेत. न्यूयॉर्कमध्ये मंगळवारी 10 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळून आले.  या संकटामुळे न्यूयॉर्कचे लोक अत्यंत दुःखी आहेत. आतापर्यंत 5 हजार 489 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर देशातील कोरोनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या न्यूयॉर्क शहरात 76 हजार 876 रुग्ण असल्याची माहिती गव्हर्नर गॅविन क्यूमो यांनी दिली आहे.

ट्रम्प यांच्याकडून मोदींची प्रशंसा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासंबंधी स्वतःची भूमिका बदलत पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा केली आहे. मोदी खरोखरच महान आणि चांगले आहेत. भारताकडून 2.9 कोटी हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन पाठविण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनने महामारीसंबंधीचा इशारा खूप अगोदर देणे गरजेचे होते.  डब्ल्यूएचओ केवळ चीनकेंद्रीत राहिले आहे. ब्रिटनने 200 व्हेंटिलेटर्सची मागणी केली आहे. अमेरिकेकडे पुढील काही दिवसांमध्ये 1 लाख 10 हजार व्हेंटिलेटर्स असतील आणि यातील काही विदेशांमध्ये पाठविले जाणार असल्याचे ट्रम्प म्हणाले.

मिस इंग्लंड उतरली मैदानात

भारतीय वंशाची ब्रिटिश नागरिक मिस इंग्लंड डॉ. भाषा मुखर्जी आता कोरोनाविरोधी युद्धात सामील झाली आहे. 2019 मध्ये मिस इंग्लंडचा मान मिळविलेल्या भाषा मुखर्जीने पुन्हा एकदा डॉक्टरी पेशा स्वीकारला आहे. कोरोना विरोधी ब्रिटनच्या लढय़ात तिने एनएचएसमध्ये भाग घेतला आहे. मॉडेलिंगकरता डॉक्टरी पेशा बाजूला ठेवणाऱया भाषाने कोरोना संकटामुळे पुन्हा वैद्यकीय सेवेत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भाषाने श्वसनप्रक्रियेशी संबंधित वैद्यकीय शिक्षण घेतले आहे.

ब्रिटनमध्ये दिवसात 786 बळी

ब्रिटनमध्ये एका दिवसात 786 जणांचा मृत्यू झाला असून 3634 नवे रुग्ण आढळले आहेत. तेथे आतार्पंत 55 हजार 242 जणांना कोरोनाची बाधा झाली असून एकूण बळींची संख्या 6159 वर गेली आहे. युरोपियन रिसर्च कौन्सिलचे अध्यक्ष प्राध्यापक माफरो फेरारी यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला आहे. युरोपीय देशांनी कोरोना रोखण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

इटलीत 135586 रुग्ण

इटलीच्या सिव्हिल प्रोटेक्शन डिपार्टमेंटनुसार देशात आतापर्यंत कोरोनाचे 1 लाख 35 हजार 586 रुग्ण सापडले आहेत. तर 17 हजार 127 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर देशात आतापर्यंत 24 हजार 392 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. इटलीत मंगळवारी 604 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 हजारपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडले आहेत.

फ्रान्सच्या अध्यक्षांचे संबोधन

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन गुरुवारी देशाला संबोधित करणार आहेत. पॅरिसमध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घराबाहेर कुठल्याही वैयक्तिक हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे. फ्रान्समधील बळींचा आकडा 10 हजार 328 वर पोहोचला आहे. गुड फ्रायडेच्या दिनी निवडक लोकांनाच नोट्रेडम कॅथेड्रल चर्चच्या प्रार्थनासभेत भाग घेता येणार आहे.

उत्तर कोरिया : 500 जणांना क्वारेंटाईन

उत्तर कोरियात 500 जणांना क्वारेंटाईन करण्यात आले असले तरीही तेथे अद्याप एकही रुग्ण आढळून आलेला नाही. नागरिकांनी अधिकाधिक प्रमाणात लसूण, कांदा आणि मधाचा आहारात वापर करावा, लोकांनी मद्यपान टाळावे असा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे. लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही औषध घेऊ नये असा सल्लाही देण्यात आला आहे.

चीनमध्ये 62 नवे रुग्ण

चीनमध्ये बुधवारी कोरोना विषाणूचे 62 नवे रुग्ण सापडले असून यात विदेशातून आलेल्या 52 लोकांचा समावेश आहे. मंगळवारी चीनमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. वुहानमध्ये 8 एप्रिल रोजी लॉकडाउन पूर्णपणे संपुष्टात आले आहे. सुमारे 76 दिवसांनी शहरातील लोक घरातून बाहेर पडत आहेत. देशात आतापर्यंत 81 802 रुग्ण सापडले असून 3333 जणांचा मृत्यू झाला आहे.

सिंगापूरमध्ये सोहळय़ांवर बंदी

सिंगापूरमध्ये गर्दी जमविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी 4 मेपर्यंत सार्वजनिक आणि खासगी दोन्ही प्रकारच्या सोहळय़ांवर लागू असणार आहे. देशात आतापर्यंत 1481 रुग्ण सापडले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

जर्मनीत 1 लाखाहून अधिक रुग्ण

जर्मनीत कोरोना बाधितांची संख्या आता 107663 झाली आहे. तर बळींचा आकडा 2016 वर पोहोचला आहे. जर्मनीत एका दिवसात 206 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 36081 जण कोरोनाच्या संसर्गातून मुक्त झाले आहेत. जर्मनीत टाळेबंदी लागू आहे.

Related Stories

ट्रम्प यांच्याकडून कोरोना मदत निधी विधेयकावर स्वाक्षरी

datta jadhav

अमेरिकेचा इशारा, पाकिस्तान धास्तावला

Patil_p

रशियाच्या सैनिकांचे मनोबळ वाढविणार चीयरलीडर्स

Patil_p

कोरोनाचा विस्फोट : जगात एका आठवड्यात सर्वाधिक 52 लाख बाधित

Tousif Mujawar

अमेरिकेत गोळीबार, 3 जणांचा मृत्यू

Patil_p

कोरोनाची उलटी गणना चांगला संकेत

Omkar B
error: Content is protected !!