Tarun Bharat

अभिनेता गौरव 30 ऑगस्टपर्यत एनसीबीच्या कोठडीत

ऑनलाईन टीम / मुंबई :

ड्रग्ज प्रकरणी मुंबईतून टिव्ही अभिनेता गौरव दीक्षित याला शुक्रवारी नर्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने अटक केली. गौरवच्या घरातून एनसीबीच्या छाप्यात एमडी ड्रग्ज, चरस आणि इतर औषधे जप्त करण्यात आली होती. ताज्या माहितीनुसार, गौरवला आता 30 ऑगस्टपर्यत एनसीबीने आपल्या ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर अनेक गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे गौरवला आता 30 ऑगस्टपर्यत एनसीबीच्या कोठडीत राहावे लागणार आहे. चित्रपट कलाकार एजाज खानच्या चौकशीच्या आधारे गौरवला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, गौरवसोबत एजाज खानचीही चौकशी केली जाणार आहे. त्याच्याकडून काही महत्वाची माहिती मिळते आहे का, याचीही चौकशी केली जाणार आहे. येत्या पुढील दिवसांत पोलीस या दोन्ही अभिनेत्यांवर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या निमित्ताने बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरण पुढे आले होते. त्यानंतर आता सातत्याने अंमली पदार्थांच्या बाबत कलाकारांची नावे पुढे येताना दिसत आहेत.

गौरव दीक्षित एक टीव्ही कलाकार असून त्याने द मॅजिक ऑफ सिनेमा, दाहेक – द रेस्टलेस माइंड ऍड बॉबी यासारखे चित्रपट तर टिव्ही सिरीयल सीता – गीतामध्ये देखील काम केले आहे. त्याच्यावर अशाप्रकारचा गंभीर आरोप झाल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

Related Stories

छत्रपती संभाजीराजे माझे भाऊच

Patil_p

आषाढी वारी सोहळ्यासाठी 10 महत्त्वाच्या पालख्यांनाच परवानगी : अजित पवार

Tousif Mujawar

Assembly Speaker Election Live Update : शिंदे गटाचा शिवसेनेला धक्का,राहुल नार्वेकर बहुमतांनी विजयी

Abhijeet Khandekar

जळगावात भीषण अपघातात 15 मजूर जागीच ठार

Tousif Mujawar

अभिनेता सोनू सूद 25 हजार लोकांना देणार रमजानमध्ये भोजन

prashant_c

कोल्हापूर : अंतुर्ली व चाफेवाडी येथील क्वारंटाइन केलेले दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage