Tarun Bharat

अभिनेता यशने परिवहन कर्मचार्‍यांना संप मागे घेण्याची केली विनंती

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकमधील रस्ते वाहतूक महामंडळाच्या विविध कर्मचारी संघटनांनी पुकारलेला राज्यव्यापी बेमुदत संप नवव्या दिवशीही सुरू असताना अभिनेता यश याने आंदोलनकर्त्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले.

राज्यातील परिवहन कर्मचाऱ्यांनी ७ एप्रिल पासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरु केला आहे. कर्मचाऱ्यांनी ६ व्य वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना पगार द्यावा अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी कर्मचारी संपावर आहेत. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बस बंद असल्याने राज्यातील सामान्य जनतेचे हाल होत आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असू संपामुळे त्या पुढे ढकलव्य लागल्या आहेत. याआधी मुख्यमंत्र्यांनी कोरोनामुळे नागरिक त्रस्त असताना आता संप करून नागरिकांना त्रास देऊ नका. लवकरत लवकर कामावर परत असे आवाहन त्यांनी केले होते. आता अभिनेता यश यानेही कर्मचाऱ्यांना संप मागे घेऊन कामावर परतण्याचे आवाहन केले आहे.

यश याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर पोस्ट करत केएसआरटीसी कर्मचारी फेडरेशनला लिहिलेल्या खुल्या पत्रात या अभिनेत्याने आपली चिंता व्यक्त केली. यशच्या वडिलांनी सुरुवातीला केएसआरटीसीमध्ये आणि त्यानंतर बीएमटीसीमध्ये बस चालक म्हणून काम केले होते.

कर्नाटक राज्य रस्ता परिवहन महामंडळ (केएसआरटीसी), ईशान्य कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एनईकेआरटीसी), उत्तर पश्चिम रस्ता परिवहन कॉर्पोरेशन (एनडब्ल्यूआरटीसी) आणि बेंगळूर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएमटीसी) चे कर्मचारी ७ एप्रिलपासून पगाराच्या मागणीसाठी अनिश्चित संपावर आहेत.

Related Stories

मुंबईत पेट्रोल दराची ‘शंभरी’कडे वाटचाल

Patil_p

बंगाल हिंसाप्रकरणी केंद्र, ममता सरकारला नोटीस

Amit Kulkarni

बेंगळूर विद्यापीठाच्या आवारातील जंगलात भीषण आग

Archana Banage

नवीन विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी आयोजित मोर्चात राजू पाटील यांचा सहभाग

Archana Banage

देशात डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर; ४ महिन्यांच्या उच्चांकावर

Abhijeet Khandekar

अभिनेत्री रागिनी द्विवेदी १५० दिवसानंतर तुरुंगातून बाहेर

Archana Banage