Tarun Bharat

अभिनेता संचित चौधरीचा थक्क करणारा प्रवास

स्टार प्रवाहवरील तुझ्या इश्काचा नादखुळा या मालिकेत रघू ही भूमिका साकारणाऱया संचित चौधरीचा अभिनयाचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. संचित मुळचा नागपूरचा. वडिल शिक्षक असल्यामुळे संचितनेही शिक्षक व्हावं अशी त्यांची इच्छा होती. संचितने सायकॉलॉजीमध्ये एम ए केलं आणि दोन वर्ष प्रोफेसर म्हणून सरकारी शाळेत नोकरीही केली.

 संचितला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. टीव्हीवरचे कॉमेडी शोज पाहून तो क्रीप्ट लिहायचा आणि शाळेत परफॉर्म करायचा. दहावीनंतर मात्र त्याला काही स्पर्धांविषयी कळलं. मग त्याने नागपूरातला रंगरसिया थिएटर ग्रुप जॉईन केला. त्यानंतर राज्यनाटय़, पुरुषोत्तम करंडक, प्रबोधन करंडक, सवाई, लोकांकिका या नाटय़स्पर्धांमध्ये भाग घेत घेत तो मुंबईत पोहोचला. मुंबईत पफथ्वी थिएटरमध्ये त्याने बरेच प्ले सादर केले. बरेच वर्कशॉप्सही तो घेत होतो. हिंदी आणि मराठीसाठी डबिंग आर्टिस्ट म्हणूनही त्याने काम केलं. नोकरी करता करता हे सर्व चालू होतं. अभिनय क्षेत्राची आवड असलेल्या संचितला नोकरीत काहीच रस नव्हता. खिसे भरत होते मात्र मन भरत नव्हतं. त्यामुळे सरकारी नोकरी सोडून त्याने पूर्णपणे अभिनय करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला घरातून विरोध झाला मात्र त्याच्या हट्टापायी वडिलांनीही साथ दिली. स्टार प्रवाहवरील प्रेमाचा गेम सेम टू सेम मालिकेत दुहेरी व्यक्तिरेखा साकारल्यानंतर आता संचित तुझ्या इश्काचा नादखुळा या मालिकेत रघूच्या भूमिकेत दिसत आहे. रघू फक्त एकदाच सांगतो नाहीतर सरळ उलटा टांगतो हे ब्रीदवाक्य घेऊन मनमौजी जगणारा. स्वातीवर त्याचं जीवापाड प्रेम आहे. स्वाती रघूच्या प्रेमाचा स्वीकार करणार का हे मालिकेच्या पुढील भागांमधून स्पष्ट होईल. तुझ्या इश्काचा नादखुळा दररोज रात्री 10.30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर प्रसारित होते.

Related Stories

प्रतीक्षा संपली- ‘आरआरआर’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला

Patil_p

फक्त एक थपडेमुळे…

tarunbharat

मुलगी झाली हो मालिकेत भावनिक वळण

Patil_p

सुनील तावडेंचं पाकिट म्हणतं ‘खामोश

Patil_p

गायक अरिजीत सिंगच्या आईचे कोरोनामुळे निधन

Tousif Mujawar

‘सनशाईन स्टुडिओ’चे ‘बॅकवॉटर्स’ चित्रपटातून निर्मितीकडे पाऊल

Patil_p