Tarun Bharat

अभिनेता सोनू सूद 25 हजार लोकांना देणार रमजानमध्ये भोजन

ऑनलाईन टीम / मुंबई :

देशात कोरोना संकट मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. या काळात अनेक लोक मदतीसाठी पुढे आले आहेत.

अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा मदतीसाठी धावून आला आहे. यावेळी सोनू सूद रमजान महिन्यात भिवंडीतील 25 हजार हून अधिक लोकांना भोजन देणार आहे. ही मदत तो उत्तर प्रदेश, बंगाल, कर्नाटक आणि बिहार मधील दुर्गम शहरातून आलेल्या स्थलांतरित आणि गरजू लोकांना करणार आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना सोनू सूद म्हणाला, हा खूप कठीण काळ आहे. यावेळी सर्वांनी मदतीसाठी पुढे आले पाहिजे. या उपक्रमातून मी त्या सर्वांना मदत करू इच्छितो, जे भुकेलेले आहेत. विशेषतः रमजान मध्ये दिवसभर उपवास करून ते उपाशी राहू नयेत म्हणून आम्ही खास जेवणाचे किट उपलब्ध करून देणार आहोत. 

दरम्यान, या आधी ही सोनू सूद ने जुहू मधील आपले हॉटेल डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खुले करून दिले आहे. तसेच तो दररोज 45 हजार पेक्षा अधिक गरजू लोकांसाठी खाण्या पिण्याच्या व्यवस्था करत आहे. त्याच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

Related Stories

शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

Tousif Mujawar

जम्मू काश्मीर : माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री माझ्यावर पाळत ठेवत आहेत ; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Archana Banage

नोएडा : ओप्पो कंपनीतील सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar

राजस्थान-हैद्राबाद आज चुरशीचा सामना

Patil_p

Video : अन् ‘ते’ शब्द कानावर पडताच स्टॅलिन यांच्या पत्नीला अश्रू अनावर

Archana Banage