Tarun Bharat

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरवर कोरोनाच्या निर्बंधांचं उल्लंघन केल्याचा आरोप; चौकशीचे आदेश

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर उपस्थित असलेल्या कार्यक्रमात कोरोनाच्या निर्बंधांचं उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. झारखंडमधील पलामू जिह्यात एका हॉटेलचे उद्धाटन कार्यक्रमाला उर्मिला मातोंडकर यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

मेदिनीनगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात कोरोनासंबंधी निर्बंधांचं उल्लंघन झाल्याची तक्कार स्थानिकांनी प्रशासनाकडे केली अशी माहिती उपायुक्त शशी रंजन यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकारी या प्रकरणाचा तपास करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

दुसरीकडे हॉटेल प्रशासनाने मात्र आरोप फेटाळले असून नियमांचे पालन झाल्याचा दावा केला आहे. उर्मिला मातोंडकर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या अशी माहिती हॉटेल प्रशासनाने दिली आहे. कोरोनामुळे आपण या कार्यक्रमासाठी दोन तासांऐवजी एक तासच उपस्थित राहू असे उर्मिला मातोंडकर यांनी कळवले होते असेही त्यांनी सांगितले आहे.

Related Stories

केरळची पुनरावृत्ती; कोल्ह्याला खायला घातले स्फोटके भरलेले मांस

datta jadhav

गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन

Archana Banage

भारत जोडो यात्रा देश जोडणारी; काँग्रेसपुरती संकुचित नाही

datta jadhav

इचलकरंजीत टेक्स्टाईल पार्कमधील केमिकल फॅक्टरीला भीषण आग

Archana Banage

हुरहुर… उत्कंठा अन्‌ जल्लोष..काटाजोड लढतीत महाविकास आघाडीची बाजी

Archana Banage

संजय राऊत आणि आमच्यात बोलणं झालं, पण लढाई सुरुच-नवनीत राणा

Archana Banage
error: Content is protected !!