Tarun Bharat

अभिनेत्री केतकी चितळेवर साताऱ्यात गुन्हा दाखल

अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार आहे. ठाणे-कळवा, पुणे,उस्मानाबाद यानंतर आता तिच्यावर साताऱ्यात गुन्हा दाखल झाला आहे. आतापर्यंत केतकीवर 12 गुन्हे नोंद झाले आहेत. राष्‍ट्रवादीच्या समिंद्रा बापूराव जाधव यांनी तक्रार दिल्यानंतर सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये रविवारी रात्री उशिरा गुन्ह्याची नोंद झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केतकीने आक्षेपार्ह शब्दात टीका केली आहे. यानंतर पोलिसांनी केतकीला अटक केली. मात्र अद्यापही तिने पोस्ट माघार घेतली नाही. सध्या ठाणे पोलिसांनी तिच्यावर कारवाई करत ताब्यात घेतलंय. कोर्टात हजर केल्यानंतर तिला तिला सत्र न्यायालयाने १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Advertisements

केतकीवर कळवा,अकोला,पवई-मुंबई,गोरेगाव,अमरावती,नाशिक,पुणे,पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, उस्मनाबाद याठिकाणी तिच्यावर याआधी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केतकीच्या या पोस्टवरून राजकिय वतावरण चांगलच तापलयं.

Related Stories

नेहमीप्रमाणे रविवारी बाधित वाढ मंदावली

datta jadhav

दोन हजाराची लाच स्वीकारताना हवालदारास रंगेहाथ पकडले

Patil_p

सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱयाच्या बंगल्यात चोरी

Patil_p

तीन बहिणींच्या मृत्यू प्रकरणी अहवालाची प्रतीक्षा

Patil_p

गणेशोत्सवाची सातारा पालिकेकडून तयारी

Patil_p

धोम कालव्यात आढळला कामगाराचा मृतदेह, एक जण बेपत्ता

datta jadhav
error: Content is protected !!