Tarun Bharat

अभिनेत्री पायल घोषचा रामदास आठवलेंच्या पक्षात प्रवेश

ऑनलाईन टीम / मुंबई : 


चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर चर्चेत आलेली अभिनेत्री पायल घोष हिने आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात प्रवेश केला आहे.


पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी पायलवर पक्षाची संगठन वाढविण्याची जबाबदारी पायलला देण्यात आली असून पक्षाच्या महिला अध्यक्षपदी नेमणूक केली आहे. 


दिग्दर्शक अनुराग कश्यपने लैंगिक शोषण केल्याचा दावा करणाऱ्या पायलने आपल्यला न्याय मिळावा असे म्हणत अनेक खटाटोप केले होते. पोलीस तक्रार दाखल केल्यानंतरही अनुरागची चौकशी न झाल्याने तिने थेट राज्यपालांकडे देखील धाव घेतली होती. 

यावेळी तिच्यासोबत केंद्रीयमंत्री रामदास आठवले देखील उपस्थित होते. पायल घोषने आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत वाय दर्जाची सुरक्षा देण्याची मागणीदेखील यावेळी आठवलेंनी केली होती. 
रामदास आठवले म्हणाले की, पोलीस तक्रारीनंतर देखील अनुराग कश्यपची अद्याप चौकशी झाली नसून, त्या संदर्भात राज्यपालांना निवेदन देण्यात आले. याआधी काल रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेमध्येत पायल घोषच्या पाठिशी रिपब्लिकन पक्ष असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, पायल घोषणे आज रिपल्बिकन पक्षात प्रवेश केला आहे. दरम्यान, अनुरागवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

Related Stories

तिरुपती-कोल्हापूर विशेष एक्सप्रेस रद्द

Archana Banage

लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी करा, 31 मे पर्यंत महाराष्ट्रात सर्वत्र ग्रीन झोन अपेक्षित : उध्दव ठाकरे

Tousif Mujawar

सत्तेत राहायचे आहे ना तुम्हाला – उदयनराजे कडाडले

Archana Banage

चुकीचे औषध देऊन मला संपविण्याचा कट

datta jadhav

आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्या न्यायाधीशांनी मांडली रशिया विरोधात भूमिका

Archana Banage

वाहतूक नियंत्रणासाठी तामिळनाडू-आंध्रप्रदेशच्या सीमेवर भिंत

prashant_c