Tarun Bharat

अभिनेत्री पॅरिस हिल्टनला पुत्ररत्न

सरोगसीच्या माध्यमातून मातृत्व

हॉलिवूड अभिनेत्री पॅरिस हिल्टनने कार्टर रियमसोबत विवाह केला होता. या जोडप्याच्या घरी नवा पाहुणा आला आहे. पॅरिस सरोगसीच्या माध्यमातून एका मुलाची आई झाली आहे. पॅरिसने सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून याविषयी माहिती दिली आहे. किम कार्देशियन हिच्यासह अनेक कलाकारांनी तिचे अभिनंदन केले आहे.

पॅरिसने बुधवारी चाहत्यांना चकित केले आहे. आपण आई झाल्याचे तिने जाहीर केले आहे. पॅरिसने याचबरोबर स्वतःच्या मुलाचे पहिले छायाचित्र शेअर केले ओ. यात तिचा मुलगा तिचा हात पकडून असल्याचे दिसून येते. प्रसिद्ध मॉडेल किम कार्देशियन तसेच गायिका डेमी लोवेटोने तिचे अभिनंदन केले आहे. किम ही पॅरस हिल्टनची घनिष्ठ मैत्रीण आहे. पॅरिस आणि कार्टरने फेब्रुवारी 2021 मध्ये विवाह केला होता. तत्पूर्वी दोघांनी परस्परांना एक वर्षांपर्यंत डेट केले होते.

आई होण्याचे माझे स्वप्न राहिले आहे. आता मी कार्टरच्या मुलाची आई झाली आहे. आई झाल्याने मी अत्यंत उत्साहित आहे. आईवडिल झाल्याने आम्हा दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे असे पॅरिसने एका मुलाखतीत म्हटले आहे. पॅरिस हिल्टन ही हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तसेच गाजलेली गायिका आहे. पॅरिसचे जगभरात कोटय़वधी चाहते आहेत.

Related Stories

एसआयटीकडून प्रकाश सिंग बादलांना समन्स

Patil_p

100 व्या वाढदिवशी पत्नीशी ‘पुनर्विवाह’

Patil_p

रश्मिका मंदाना टॉप इन्स्टाग्राम सेलेब्रिटी

Patil_p

11 मार्चला पडद्यावर दिसणार काश्मिरी पंडितांच्या वेदना

Patil_p

मध्यप्रदेश : खाद्यपदार्थात भेसळ करणाऱ्यांना होणार जन्मठेप

datta jadhav

‘बंडखोर आमदारांना बंगालला पाठवा, आम्ही त्यांचा चांगलाच..!’

Archana Banage