Tarun Bharat

अभिनेत्री यशिका आनंद दुर्घटनेत जखमी

मैत्रिणीचा दुर्घटनास्थळीच मृत्यू

तमिळ अभिनेत्री यशिका आनंद शनिवारी रात्री एका भीषण कार दुर्घटनेत सापडली आहे. महाबलीपुरमच्या ईस्ट कोस्ट रोडवर ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत यशिका गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तिच्या एका मैत्रिणीचा या दुर्घटनेत घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.

यशिकाची कार दुभाजकाला आदळली होती. दुर्घटनेनंतर यशिकासमवेत तीन जणांना कारमधून बाहेर काढण्यात आले. तिघांनाही नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले. तर यशिकाची मैत्रिण वल्लिचेट्टी भवानी ही कारमध्येच अडकून पडली होती. तिला वाचविण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. महाबलीपुरम पोलिसांनी गुन्हा नोंदवून या दुर्घटनेचा तपास सुरू केला आहे. मद्याच्या नशेत वाहन चालविले जात होते असा पोलिसांना संशय आहे.

यशिका आनंद टीव्ही रियलिटी शो ‘बिग बॉस तमिळ 2’मध्ये दिसून आली होती. यशिकाने ‘कवालई वेंदम’ या तमिळ चित्रपटामधून पदार्पण केले होते. ‘धुरुवंगल पथिनारु’ चित्रपटामुळे तिला ओळख मिळाली होती. याचबरोबर तिने ‘अरुट्टु आरायिल मुराट्टू कुतु’ ‘जोंबी’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.

Related Stories

अनुष्का शेट्टीला मिळाले वाढदिवसाचे गिफ्ट

Patil_p

शिवानी रांगोळे होणार लोकप्रिय अभिनेत्रीची सून

Amit Kulkarni

ढोल ताशा स्पर्धेतून पारंपारीक वाद्यांची मेजवानी

mithun mane

जांबाज हिंदुस्थान के’ वेबसीरिज लवकरच

Patil_p

दख्खनचा राजा ज्योतिबामध्ये मोठय़ा ज्योतिबाची एण्ट्री

Patil_p

काजोलला अपार्टमेंटच्या भाडय़ापोटी मिळतात 90 हजार

Patil_p