Tarun Bharat

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक

ऑनलाईन टीम / मुंबई : 


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. सोमवारी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून ॲप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कु्ंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सात ते आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कुंद्राला अटक केली. 


मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. पॉर्न फिल्म्सची निर्मिती करून या फिल्म्स काही मोबाईल ॲप्सवर प्रदर्शित केल्या जात असल्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणले होते. याप्रकरणात पोलिसांनी एका अभिनेत्रीलाही अटक केली होती. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.

 
या प्रकरणात पोलिसांकडून चित्रपट बनवणाऱ्या अनेकांची चौकशी करण्यात आली होती. 19 जुलै रोजी कुंद्राला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. सुमारे 7 ते 8 तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी राज कुंद्राला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, राज कुंद्राला आज (20 जुलै) न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. राज कुंद्राविरोधात पुरेसे पुरावे असल्यामुळे अटक करण्यात आली आहे.

Related Stories

Kamal Hasan : चोल काळात हिंदू धर्म नव्हता : कमल हसन यांचा वेत्रीमारन यांना पाठिंबा

Abhijeet Khandekar

नितीन गडकरींच्या पत्राला मुख्यमंत्र्यांच उत्तर म्हणाले, तुम्ही बोलता फार प्रेमळ पण लिहिता कठोर

Archana Banage

निवडणूक आयोग उगवता सूर्य आणि त्रिशूळ दोन्ही चिन्ह नाकारणार, ठाकरे आणि शिंदे यांना कोणते चिन्ह मिळणार?

Archana Banage

मोदी नसते तर भारताची अवस्था अफगाणिस्तानसारखी झाली असती- कंगना राणावत

Archana Banage

‘घूमर’मध्ये सैयामी खेर शिकणार क्रिकेट

Patil_p

‘मिस्टर अँड मिसेज माही’ चित्रपटाची घोषणा

Patil_p