Tarun Bharat

अभिव्यक्ती स्वातंत्र्य डावलने हे घटनाबाहय़

कायदेतज्ञ ऍड. असिम सरोदे यांचा घणाघात, प्रशासकीय अधिकाऱयांनी मराठीही शिकावी

प्रतिनिधी/ बेळगाव

केवळ मराठी आहे म्हणून जर अन्याय होत असेल तर हा नागरी हक्क विरोधातील भाग आहे. पोलिसी बळाचा वापर करून दबाव टाकणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. प्रत्येक भारतीयाला आपल्याला व्यक्त होण्याचा अधिकार आहे. परंतु बेळगावमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच घाला घातला जातो. ही कृती घटनाबाहय़ असल्याचा घणाघात पुणे येथील कायदेतज्ञ ऍड. असिम सरोदे यांनी केला.

साम्यवादी परिवार आणि आम्ही बेळगावकर मराठी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी बेळगावमध्ये होणारी मानवाधिकारांची पायमल्ली या विषयावर विचार मांडले. व्यासपिठावर माजी महापौर ऍड. नागेश सातेरी, बार असो. चे उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण व पियूष हावळ उपस्थित होते.

प्रशासकीय अधिकाऱयांनी मराठी शिकण्याची गरज

बेळगावमध्ये कन्नडसह मराठी भाषिकांचे प्राबल्य अधिक आहे. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखायची असेल तर कन्नडसह मराठी येणाऱया अधिकाऱयांची या ठिकाणी नेमणूक करावी, लोकांचे प्रश्न समजावून घ्यायचे असतील तर पोलीस अथवा इतर प्रशासकीय अधिकाऱयांनी मराठी शिकून घ्यावी. दुकानदारांना त्यांना हवे असणाऱया भाषेमध्ये फलक लावू देण्याची मुभा द्यावी, असे त्यांनी सांगितले.

बेळगावसाठी विशेष अधिकाऱयांची नेमणूक करा

ज्या ठिकाणी अल्पसंख्याक आहेत. त्या ठिकाणी विशेष अधिकाऱयाची नेमणूक करणे गरजेचे आहे. घटनेतील कलम 350 बी मध्ये विशेष अधिकारी नेमण्याची तरतूद आहे. आणि तसे अधिकारी नेमले नसतील तर हा एक याचिका दाखल करण्याचा विषय आहे. भाषिक अल्पसंख्याक व धार्मिक अल्पसंख्याक हे वेगवेगळे मुद्दे असून, या दोन्हींचे कार्यालय देखील स्वतंत्र असले पाहिजे, असे ऍड. असोदे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पियूष हावळ यांनी केले. ऍड. नागेश सातेरी यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला बेळगाव परिसरातील नागरिक उपस्थित होते..

Related Stories

हलगा-मच्छे बायपासप्रकरणी अवमान याचिका

Omkar B

मराठा आरक्षणासाठी जागृती

Patil_p

विनायकनगरमधील रस्त्यांसाठी एक कोटीचा निधी

Patil_p

सरकारच्या मार्गसूचीनुसार लसीकरण करा

Amit Kulkarni

शिवप्रतिष्ठानची आज महत्त्वपूर्ण बैठक

Patil_p

‘आझादीका अमृत महोत्सव’

Patil_p