Tarun Bharat

अभिषेक बच्चन याची कोरोनावर मात!

ऑनलाईन टीम / मुंबई :


अभिनेता अभिषेक बच्चन याचे कोरोनाचे रिपोर्ट 28 दिवसानंतर आज निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती स्वतः अभिषेक बच्चनने ट्विट करत दिली आहे. 


अभिषेकने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझे कोरोनाचे रिपोर्ट आज निगेटिव्ह आले आहेत. मी तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे मी आजारावर मात केली आहे. याबद्दल मी नानावटी हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ या सर्वांचे आभार मानतो तसेच चाहत्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी केलेल्या प्रार्थनेसाठी मी तुमचा आभारी आहे. 


यापूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर संपूर्ण बच्चन कुटुंबीयांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या या तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. यानंतर अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, आराध्या आणि ऐश्वर्या बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, आराध्या, ऐश्वर्या आणि अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.  

Related Stories

UPSC परीक्षेचा निकाल जाहीर, यावर्षीही मुलींची बाजी

datta jadhav

”जर अशा पद्धतीने लोक फिरणार असतील तर कडक निर्बंध गरजेचे”

Archana Banage

आष्ट्यात पेट्रोल-डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरला आग

Abhijeet Khandekar

अलाया ‘स्ट्रीटफुड’ खाण्यासाठी आतुर

Patil_p

महाराष्ट्रातील कोरोना : रुग्ण संख्येत पुन्हा काहीशी वाढ; 236 मृत्यू

Tousif Mujawar

बारामतीत सूर्य पश्चिमेकडे उगवेल; पण पवारांना…; जयंत पाटलांकडून भाजपचा समाचार

Archana Banage