Advertisements
जम्मू
अमरनाथ यात्राकाळात घातपात घडवण्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिल्यानंतर येथील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे दोन वर्षांनंतर श्री अमरनाथ यात्रा 29 जून रोजी सुरू होत आहे. प्रवासाबाबत आंतरराष्ट्रीय सीमेपासून शहरापर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रवासाच्या पहिल्या तुकडीच्या प्रस्थानादरम्यान संपूर्ण यात्रामार्गावर ड्रोन कॅमेऱयांद्वारे नजर ठेवण्यात आली. तसेच ठिकठिकाणी अतिरिक्त सुरक्षाही पुरविण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेकरूंना राहण्याची व्यवस्था केलेल्या जम्मूतील भगवती नगरसह शहरातील सर्व ठिकाणांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आरएसपुरा येथे घुसखोरी करताना एका पाकिस्तानी नागरिकाला ठार केल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे.