Tarun Bharat

अमरावती हिंसाचार प्रकरणी अनेक भाजप नेत्यांना अटक

ऑनलाईन टीम / अमरावती

अमरावती येथे भाजपने १३ नोव्हेंबर रोजी अमरावती बंदची हाक दिली होती. त्रिपुरातील अत्याचाराविरोधात अमरावतीत १३ नोव्हेंबर रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर १५ ते २० हजार लोकांनी निषेध मोर्चा काढला होता. यावेळी जमाव आक्रमक झाला. आणि या बंद ला हिंसक वळण लागले यावेळी भाजपाच्या काही नेत्यांना यात सहभागी झाल्याच्या संशयावरुन दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भाजपाचे नेते आणि महापालिकेचे गटनेते तुषार भारती यांना अटक करण्यात आली आहे. अमरावती शहरातील साईनगर कॉलनीतील गणेशविहार येथील राहत्या घरातून केली अटक तुषार भारती यांच्याबरोबरच माजी आमदार अनिल बोंडे, भाजपा जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनाही पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त आहे.

भाजपाने १३ नोव्हेंबर रोजी अमरावती शहर बंदचे आवाहन केलं. मात्र, या बंद दरम्यान आंदोलकांनी हिंसा केल्याचं पहायला मिळालं. आता याच प्रकरणामध्ये पोलिसांनी काही भाजपा नेत्यांना ताब्यात घेतलं आहे. या दंगली दरम्यान अमरावतीसह नांदेड, मालेगाव, वाशिम आणि यवतमाळमध्ये दगडफेकीचे प्रकार घडले. यात आतापर्यंत २० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अनेक जणांना अटक करण्यात आलीय.

Related Stories

खासदार धनंजय महाडिक यांचे शिरोलीत जंगी स्वागत

Abhijeet Khandekar

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुण्यात निधन

Tousif Mujawar

लस घेतलेले शिक्षक घरातच

Patil_p

महाराष्ट्रातील 203 विद्यार्थी अडकलेत रशियात

datta jadhav

कोळवणच्या जंगलात आढळलेल्या मृत बिबट्याचे वन विभागाने केले दहन

Archana Banage

Shraddha Murder :शिमल्यात आफताब-श्रद्धानं केला होता गांजा खरेदी

Archana Banage