Tarun Bharat

अमर सरदेसाई यांच्याकडून रुग्णवाहिका खरेदीसाठी 50 हजारांची देणगी

प्रतिनिधी / बेळगाव

कर्नाटक राज्य मान्यताप्राप्त इलेक्ट्रिक कंत्राटदार असोसिएशनच्या जिल्हा कमिटीचे सेपेटरी अमर सरदेसाई यांच्याकडून रुग्णवाहिका खरेदीसाठी 50 हजार रुपयांची देणगी देण्यात आली. श्रीराम सेना हिंदुस्थानच्या पदाधिकाऱयांकडे ही मदत देण्यात आली.

कोरोना काळात श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने उत्तम सेवा दिली जात आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. गरजू रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे. काही खासगी रुग्णवाहिका चालकांकडून पैशांची लूट केली जात असल्याने श्रीराम सेनेच्या माध्यमातून मोफत रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार आहे. हे समजताच अमर सरदेसाई यांनी श्रीराम सेनेला 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. श्रीराम सेनेचे सचिन चव्हाण यांच्याकडे ही मदत सुपूर्द करण्यात आली.

Related Stories

सत्तेत आल्यास 200 युनिट वीज मोफत

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हय़ात शनिवारी 32 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

Tousif Mujawar

मराठा निगममुळे राज्यातील समाज एकत्र येईल

Omkar B

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार : बंगळूर पोलीस आयुक्त

Archana Banage

कंग्राळी बुद्रुक-गौंडवाड येथे मतदान चुरशीने

Amit Kulkarni

श्रीपंत महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाची अमाप उत्साहात सांगता

Omkar B